Saturday, November 2, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडभारत नाना भालके यांना श्रद्धांजली म्हणून भगीरथ भालके यांना निवडून द्या-युवा नेते...

भारत नाना भालके यांना श्रद्धांजली म्हणून भगीरथ भालके यांना निवडून द्या-युवा नेते बालाजी सलगर..

खोपोली- दत्तात्रय शेडगे.

पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांचे कोरोंनाने नुकतेच निधन झाले त्यामुळे त्या मतदार संघाची निवडणूक येत्या 17 तारखेला पार पडणार आहे त्यामुळे भारत नाना भालके यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून त्यांचे पुत्र भगीरथ भालके यांना निवडून देण्याचे राष्ट्रवादी कॉग्रेस सोलापूर जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे सरचिटणीस बालाजी सलगर यांनी केले आहे.

देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष,विद्यमान खासदार,शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री,खासदार,आमदार विविध पदाधिकारी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मोठया प्रमाणावर अग्रेसर असल्याचे आपण पाहिले आहे,त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारादरम्यान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या आश्वासानाच्या प्रत्येक गोष्टीची पूर्तता होणार आणि त्याची कृतीही होणार असून अजित पवार हे शब्दाचे पक्के आहेत,अशी त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात असल्याचे सामाजिक न्याय विभागाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बालाजी भागवत सलगर यांनी सांगितले.


पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी तसेच या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमध्ये घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावाचा पाण्याचा मूळ प्रश्न सोडवण्यासाठी व या मतदारसंघात केंद्रस्थानी असलेल्या सर्वसामान्य माणूस,शेतकरी, महिला, सुशिक्षित बेरोजगार युवक,यांचे प्रश्न प्रामुख्याने सोडवण्यासाठी आमदार भारत भालके यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून त्यांचे पुत्र भगीरथ भालके यांना निवडून देण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे सरचिटणीस बालाजी भागवत सलगर यांनी केले आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page