Wednesday, September 27, 2023
Homeपुणेमावळभा का सेना महासंघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष इरफानभाई सय्यद यांच्या वाढदिवसा निमित्त...

भा का सेना महासंघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष इरफानभाई सय्यद यांच्या वाढदिवसा निमित्त देवले येथे धान्य वाटप..

देवले दि.16:भारतीय कामगार सेना महासंघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष इरफानभाई सय्यद यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत संघटनेच्या वतीने मावळ तालुक्यातील देवले या गावातील नैसर्गिक शिक्षण व संशोधन प्रशिक्षण संस्था या ठिकाणी धान्य वाटप करण्यात आले. इरफानभाई सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल डिस्टेंसिंगचे पालन करुन धान्य वाटप करण्यात आले.

यावेळी बांधकाम मजुर योजनेचे मावळ तालुका अध्यक्ष महेश हुलावळे,पु.जि.आरटीआय सदस्य सुनील गुजर,संतोष बोंबले( सि.अभिनेते शिवसेना.उ.वि.प्रमुख) रामदास हुलावळे,संदिप चौरे( मा.उपसरपंच), बाबाजी सोंडेकर (युवा नेता) किशोर वायकर,महेश दळवी,अनिकेत भांगरे ,हे उपस्थित होते.

यावेळी सुनिल गुजर आणि संतोषशेठ बोंबले यांनी आपले मनोगत व्यक्त केले कष्टकरी जनतेच्या पोटाची जाण असणारा त्यांच्या हक्कासाठी लढणारा तळमळीचा नेता म्हणजे इरफानभाई सय्यद संघटनेच्या माध्यमातुन आपल्या कामाच्या जोरावर घराघरात पोहचलेला माणुस अशा शब्दात त्यांचे कौतुक करण्यात आले.

- Advertisment -