Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडभिसेगाव- गुंडगे प्रभागात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांच्या घरांची तलाठ्यांकडून पाहणी..

भिसेगाव- गुंडगे प्रभागात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांच्या घरांची तलाठ्यांकडून पाहणी..

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
रायगड जिल्ह्यासहित कर्जत तालुक्यात देखील पावसाच्या अतिवृष्टीने हाहाकार करून सतत पाच दिवस पडत असलेल्या पावसामुळे कर्जत तालुक्यात नद्यांची पातळी ओलांडल्याने महापूर झाला.त्यामुळे अनेकांचे नुकसान झाले.या नुकसानीचे प्रत्यक्ष जागेवर जाऊन कर्जत शहराचे तलाठी अधिकारी यांनी भिसेगाव व गुंडगे प्रभागात जाऊन पाहणी केली.

कर्जत नगर परिषदेच्या पश्चिमेला भिसेगाव व गुंडगे प्रभाग आहेत.या प्रभागाच्या बाजूला डोंगर दऱ्या सारखा भाग असल्याने दरवर्षी या भागात डोंगरावरून येणारे पाणी प्रभागात येत असते.मात्र यावर्षी पावसाची पाच दिवस संततधार चालू असल्याने नद्यांची पातळी ओलांडली व कर्जत शहरात पाणी शिरले.तसेच भिसेगाव व गुंडगे प्रभागात देखील पाणी आले.

रात्री लाईट नसल्याने घरातच असलेल्या नागरिकांना पाणी घरात कधी आले.याचा थांगपत्ता देखील नसताना घरातील अनेक किमंती वस्तूंचे नुकसान झाले. घरात चार फुटावर पाणी असल्याने टीव्ही ,फ्रीज ,वोशिंग मशीन ,फर्निचर ,बेड ,गाद्या, कपाटात पाणी शिरून कपडे अशा विविध किंमती वस्तु खराब झाल्या.तर भिसेगाव येथे घरातील लाद्या देखील बाहेर निघाल्या.

पंचशीलनगर गुंडगे रोड येथील नागरिकांचे देखील अतोनात नुकसान झाले.या सर्व बाबींचा भिसेगाव व गुंडगे प्रभागात प्रत्यक्ष जागेवर जाऊन कर्जत तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या आदेशाने कर्जत तलाठी सजेचे अधिकारी ठोकळे यांनी पाहणी केली.यावेळी त्यांना भिसेगाव येथील नगरसेवक सोमनाथ ठोंबरे, पोलीस पाटील संजय हजारे ,गुंडगे येथील माजी नगरसेवक दिपक मोरे ,दोन्ही प्रभागातील तरुण सामाजिक कार्यकर्ते ,यांनी नुकसान झालेले घर दाखवून सहकार्य केले.

- Advertisment -

You cannot copy content of this page