Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडभिसेगाव ते कर्जत जोड रेल्वे भुयारी मार्गा बाबत करण्यात येणारे अमोघ कुळकर्णी...

भिसेगाव ते कर्जत जोड रेल्वे भुयारी मार्गा बाबत करण्यात येणारे अमोघ कुळकर्णी यांचे उपोषण तात्पुरते स्थगित !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत – भिसेगाव जोड रेल्वे भुयारी मार्गा करीता दिनांक १२ जून २०२३ रोजी माहिती अधिकार कर्जत अध्यक्ष अमोघ कुळकर्णी व भिसेगाव ग्रामस्थ उपोषणास बसणार होते . या बाबत ग्रामस्थ मंडळ भिसेगाव यांची बैठक झाली असता कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांची भेट घेण्याचे निश्चीत करण्यात आले होते , त्यानुसार त्यांच्या भेटीत त्यांनी श्री अंबे भवानी रेल्वे भुयारी मार्ग होण्याबाबत भिसेगाव ग्रामस्थांना ठोस आश्वासन देवून या मार्गासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून या कर्जत – भिसेगाव रेल्वे भुयारी मार्गाचे काम लवकरच सुरू करून मार्गी लावण्यात येईल , असे लेखी आश्वासन दिल्याने ग्रामस्थ मंडळांनी उपोषणकर्ते अमोघ कुळकर्णी यांना उपोषण स्थगित करण्यासंबंधी विनंती पत्र दिल्याने त्यांचे होणारे उपोषण तूर्त स्थगित करण्यात आले असल्याचे माहिती अधिकार कर्जत अध्यक्ष अमोघ कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

कर्जत – भिसेगाव रेल्वे भुयारी मार्ग होण्यासंबंधी आरपार ची लढाई जिंकण्याच्या हेतूने अमोघ कुळकर्णी आणि भिसेगाव ग्रामस्थ १२ जून रोजी आमरण उपोषणास भिसेगाव येथे बसणार होते , मात्र कर्जत खालापूरचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी उपोषण करू नये , भुयारी मार्गा बाबत लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देत असल्याचे लेखी आश्वासन दिल्याने , हे काम आता लवकरच मार्गी लागणार आहे . म्हणून भिसेगाव ग्रामस्थांच्या विनंतीचा मान राखून उपोषण तात्पुरता स्थगित करत आहे.
आपण सर्वांनी दिलेल्या पाठींब्याने आणि आपण मिळुन करत असलेल्या पाठपुराव्याने मला आशा आहे की, भुयारी मार्गाचे काम आमदार साहेब यांनी दिलेल्या शब्दानुसार लवकरात लवकर निधी उपलब्ध करून काम पूर्ण होईल .आपल्या एकजुटीमुळे आज आमदार साहेबांना दखल घ्यावी लागली आहे. त्यामुळे आपल्या सर्वांच्या एकजुटीचा थोडाफार का होईना विजय झाला आहे .विश्वास आहे की, जे अडथळे असतील ते दूर होऊन लवकरात लवकर श्री अंबे भवानी रेल्वे भुयारी मार्गाचे काम चालू होईल , म्हणजे पुन्हा उपोषण करण्याची वेळ येणार नाही , असे मत अमोघ कुलकर्णी यांनी मांडून उपोषण तूर्त स्थगित केले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page