Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडभिसेगाव प्रीमियर लीग-२०२१ पर्व २ रे जल्लोषात खेळून,जेपी चॅलेंजर्स प्रथम विजेता..

भिसेगाव प्रीमियर लीग-२०२१ पर्व २ रे जल्लोषात खेळून,जेपी चॅलेंजर्स प्रथम विजेता..

भिसेगाव-कर्जत/सुभाष सोनावणे-

सालाबाद प्रमाणे यावर्षीही जय अंबे क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ भिसेगाव तर्फे अंडरम ओव्हर क्रिकेटचे सामने भिसेगाव प्रीमियर लीग -२०२१ पर्व दुसरे दि.६ व ७ फेब्रुवारी २०२१ रोजी ” आपले गाव आपली स्पर्धा ” मोठया जल्लोषात भिसेगाव येथे पाल टॉवरच्या बाजूला खेळले गेले.यांत एकूण दहा संघाने भाग घेतला होता.

दोन दिवसांत ४९ सामने खेळून प्रथम विजेतेपद जेपी चॅलेंजर्स यांनी पटकावले , तर द्वितीय विजेतेपद जय गणेश टीम , तृतीय विजेतेपद पहल इंटरप्रायजेस टीमने तर चौथ्या क्रमांकावर विहा वोरियर्सने विजेतेपद पटकावले .यावेळी लहान मुलांचेही सामने खेळविले गेले.


गतवर्षी सारखाच पुन्हा तोच उत्साह , तोच जल्लोष व सर्वांच्या सहकार्यामुळेच भिसेगाव येथे क्रिकेट स्पर्धेचे सुंदर नियोजन करण्यात आले होते .या स्पर्धेचे उद्दीष्ठ आपल्या गावातील सगळ्या तरुणांनी एकत्र यावे व लहान मुलांमध्ये मैदानी खेळाविषयी आकर्षक निर्माण होण्यासाठी त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होतेे.

कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता आयोजकांनी स्पर्धा यशस्वी करून दाखवली व सर्वांनी सुद्धा खेळाडू वृत्तीने आपले प्रदर्शन दाखवून स्पर्धा यशस्वी केली.यांत प्रथम पारितोषिक विजेतेपद जेपी चॅलेंजर्स टीम चे मालक प्रफुल्ल निकम व जयेश फडके यांनी पटकावले.

त्यांना दहा हजार एक रुपये व आकर्षक चषक व दुसरे पारितोषिक जय गणेश टीमचे मालक दिनेश ठोंबरे , अजय खराडे यांनी मिळवले त्यांना पाच हजार एक रुपये व आकर्षक चषक , व तिसरे विजेतेपद पहल इंटरप्रायजेसचे मंगेश परदेशी , चंद्रकांत राऊत , यांना दोन हजार पाचशे रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले तर चौथे विजेतेपद विहा वोरियर्स यांनी जिंकले त्याचे मालक योगेश आंब्रे व टीमला दोन हजार पाचशे तसेच आकर्षक चषक देण्यात आले.


इतर भाग घेणारे संघ श्री जय अंबे , बर्थडे बॉईज , भिसेगाव टायगर्स , एस पी लायन्स , जय भोलेश्वर , शिवाण्या शिलेदार या टीमच्या खेळाडूंनी भाग घेतला होता .यांत सामनावीर म्हणून -अजित दरवडा , उत्कृष्ट फलंदाज- आकाश देशमुख , उत्कृष्ट गोलंदाज-रूपेश जाधव , मालिकावीर-रुपेश जाधव यांस , गौरविण्यात आलेे.

यावेळी भिसेगाव प्रीमिअर लीग यशस्वीपणे पार पाडणारे भिसेगाव पोलीस पाटील संजय हजारे, समालोचकाची भूमिका पार पाडणारे प्रेमनाथ गोसावी सर, टी- शर्ट चे लोगो व स्पर्धेचे यशस्वी मॅनेजमेंट करणारे विनायक लाड , मंडप , रोषणाई यांची व्यवस्था करणारे सुनील दिसले ,आकर्षक चषक देणारे अतुलदादा ठोंबरे , पंच या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले .

- Advertisment -

You cannot copy content of this page