Tuesday, September 26, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडभुतिवली गावातील विद्युत खांब आणि विद्युत वाहिन्यांची दुरावस्था...

भुतिवली गावातील विद्युत खांब आणि विद्युत वाहिन्यांची दुरावस्था…

(कर्जत प्रतिनिधी : गुरुनाथ नेमाणे)
दि. 08, कर्जत तालुक्यातील भुतीवली गावात मधील रस्त्यावर असणारे विद्युत खांब आणि विद्युत वाहिन्यांची दुरावस्था झाली असून, विद्युत वाहिन्या खाली लोंबल्या आहेत तर विद्युत खांब वाकडे होऊन जमीनदोस्त होण्याच्या तयारीत आहेत. सदर रस्ता भुतिवली गावच्या दळणवळणाचा एकमेव मार्ग असून ह्या रस्त्यावरून बऱ्याच प्रमाणात नागरिक येजा करत आहेत.

आणि ह्या लोंबलेल्या विद्युत वाहिन्यांमुळे दुर्घटना होऊन जीवित हानीही होऊ शकते. भर पाऊस आणि वाऱ्याचा प्रहार यामुळे खूप मोठा धोका होऊ शकतो. आणि अपघात हा अचानक होत असतो यावेळी कोणतीही हानी होऊ नये अशी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर धोका टाळण्यासाठी वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.यासंदर्भात भुतिवली ग्रामस्थ मंडळींनी अनेक वेळा तक्रार देऊ सुद्धा महावितरण त्याकडे लक्ष देत नाही, अशी माहिती नागरिकांकडून मिळाली आहे. भुतिवली गावच्या ह्या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन निवारण विद्युत वितरण कंपनीने करण्यात यावे असे मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -