Wednesday, September 27, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडभुतीवली कातकरी वाडी येथील मानवसेवा बहुउद्देशी संस्थाच्या माध्यमातून उद्योगसंदर्भात मार्गदर्शन……

भुतीवली कातकरी वाडी येथील मानवसेवा बहुउद्देशी संस्थाच्या माध्यमातून उद्योगसंदर्भात मार्गदर्शन……

(कर्जत प्रतिनिधी गुरुनाथ नेमाणे)

दि २०.कर्जततालुक्यातील आसल ग्रामपंचायत हद्दीतील भुतीवली कातकरी वाडी मध्ये प्रशिक्षण क्षेत्रातील मार्गदर्शन करण्यात आले आहे.या प्रशिक्षण मार्गदर्शन करते वेळी भुतीवली कातकरी वाडी महिला मंडळ यांच्या चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

आताच्या बदलत्या युगात डिजिटल इंडिया सरकार नियोजित प्रत्येक महिला ही सशक्त झाली पाहिजे,आणि ती सुशिक्षित राहावी,आणि त्यांना त्यांच्या पायावर उभे राहिले पाहिजे,आणि हाताला काम असा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मानवसेवा बहुउद्देशी संस्था कर्जत यांच्या पुढाकाराने प्रत्येक आदिवासी भागातील महिला आणि नागरिक त्याच्या पायावर उभे राहिले पाहिजे,सदर रोजगार उपलब्ध करून दिला की,त्यांना हाताला काम मिळालेले की,आर्थिक परिस्थिती तसेच कलाची माहिती अवगत होईल,असच पुढंच ध्येय साध्य होईल,आणि आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहतील.

यावेळी उपस्थित मानवसेवा बहुउद्देशी संस्था संस्थापक दिपक जगताप,मानवसेवा बहुउद्देशी संस्था महिला अध्यक्षा सविता जगताप,मानवसेवा बहुउद्देशी संस्था प्रशिक्षण मार्गदर्शक रोहिदास लोभी सर,ग्रामपंचायत आसल सदस्या मंजुळा घोगरकर,रायगड जिल्हा प्रतिनिधि गुरुनाथ नेमाणे इत्यादी आदीसह उपस्थित होते.त्याचठिकाणी भुतीवली कातकरी वाडी महिलानी वर्गही मानवसेवा बहुउद्देशी संस्था प्रशिक्षण महत्व जाणून घेतले.

- Advertisment -