Saturday, July 27, 2024
Homeपुणेलोणावळाभोंडे हायस्कूल येथे पहिली ते दहावीच्या मुलांनी केले गिता पठण…

भोंडे हायस्कूल येथे पहिली ते दहावीच्या मुलांनी केले गिता पठण…

लोणावळा (प्रतिनिधी): गीता जयंतीचे औचित्य साधत लोणावळा येथील अॅड. बापूसाहेब भोंडे हायस्कूलच्या 1500 विद्यार्थ्यांनी श्रीमद्भगवद्गीतेतील पंधराव्या अध्यायाचे सामुहिक पठण केले.
अॅड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल लोणावळा व गीता परिवार यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शनिवारी सकाळी 8.०० वाजता भोंडे हायस्कूलच्या प्रांगणात शाळेचे इयत्ता 1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांनी गीतेतील पंधराव्या अध्यायाचे पठण सामुहिकरित्या केले. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे व श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथाचे पुजन करण्यात आले .शाळेच्या शिक्षिका मुग्धा पुंडे यांनी विद्यार्थ्यांना पुराणातील गोष्टींची व सुभाषितांची उदाहरणे देत संस्कृत भाषा किती सुंदर सहज सोपी आहे हे समजावून सांगितले.
यावेळी विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष माधवराव भोंडे, सचिव राधिका भोंडे ,विश्वस्त राजु खळदकर ,संजय वीर ,व्हीपीएस हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रमोद देशपांडे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक अमोल साळवे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अंजुम शेख,माध्यमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका तृप्ति गव्हले ,प्राथमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका स्मिता इंगळे,पर्यवेक्षिका माधवी थत्ते आदी मान्यवर उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page