मंदिरे व प्रार्थनास्थळे सुरु करण्यात यावी म्हणून मावळ भाजप च्या वतीने घंटानाद आंदोलन…….

0
193

( कार्ला प्रतिनिधी )
वेहरगाव- मावळ दि. .29 कोरोना(कोविड) महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे पाच महिन्यांपुर्वी बंद केलेली मंदिरे(प्रार्थनास्थळे) अद्यापपावेतो बंद स्थितीत आहेत. परंतु महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन शिथील करण्याची प्रक्रिया १ जून २०२० पासून सुरू झालेली आहे. यानुसारच राज्यातील दारुची दुकाने मात्र खुली करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.

परंतु येथील मंदिरे व प्रार्थनास्थळांवर अद्यापही बंदी का ? लाॅक डाउन चालु झाल्यापासून अनेकांचे रोजगार बुडाले ,कार्ला परिसरात वर्षं विहारासाठी अनेक पर्यटक येत असतात,या येणाऱ्या पर्यटकांवर छोटे – मोठे व्यवसायिक, रिक्षा चालक यांचा ,रोजगार अवलंबून असतो, परंतु मागील पाच महिन्यांपासून मंदिरे(प्रार्थनास्थळे)बंद असल्यामुळे तेथील सामान्य जीवन विस्कळीत झाले आहे.

म्हणून राज्यातील सर्व मंदिरे(प्रार्थनास्थळे) कायमस्वरूपी खुली करावीत या मागणीसाठी आई एकविरा देवी मंदिर वेहेरगाव याठिकाणी भाजपा तालुकाध्यक्ष मा श्री. रविंद्रआप्पा भेगडे मावळ तालुका महिला आघाडी अध्यक्ष सायलीताई बोत्रे महाराष्ट्र प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे सरचिटणीस सुनील चव्हाण, मच्छिंद्र केदारी, माजी जिल्हा परिषद सदस्य मिलिंद बोत्रे, वाकसई गणअध्यक्ष सचिन येवले , कुसगाव गण अध्यक्ष शेखर दळवी, नाणे मावळ महिला आघाडी अध्यक्षा सीमा आहेर मधुकर पडवळ एकनाथ गायकवाड वसंतराव माने, माजी सरपंच दत्तात्रय पडवळ , सदाशिव बांगर अमोल भेगडे ,रामचंद्र पडवळ मंगेश देशमुख मोरेश्वर पडवळ निवृत्ती बोत्रे पांडुरंग बोत्रे नवनाथ कडु , पांडुरंग माने ,विशाल रसाळ ,पांडुरंग पवार, लतिफ शेख,प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सोशल डिस्टंन्सिंगच्या सर्व सरकारी नियमांचे पालन करुन घंटानाद आंदोलन करण्यात आले आंदोलनास महीलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता