if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यातील हालीवली ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच सौ. प्रमिला सुरेश बोराडे यांचे कार्य उल्लेखनीय सुरू असून नुकतेच त्यांच्या नेतृत्वाखाली हालीवली येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी राबविलेल्या नविन मतदार नोंदणी , नाव दुरूस्ती , मतदार यादीत नविन नाव समाविष्ट करणे , मतदार यादीतील नाव कमी करणे , या अभियानाला तसेच ” आयुष्यमान भारत योजनेच्या ” शिबिरास हालीवली ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला . आयुष्यमान भारत योजने अंतर्गत देशातील रूग्णाला खाजगी अथवा सरकारी रूग्णालयात ५ लाखांपर्यंत मोफत सुविधा मिळू शकतात. त्यामुळे त्यांनी आजपर्यंत करत असलेल्या नागरिकांप्रती कार्यास हालीवली ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.
हालीवली सरपंच सौ.प्रमिला सुरेश बोराडे यांनी गेल्या पाच वर्षांत ग्रामपंचायच्या माध्यमातून तसेच वैयक्तिक प्रयत्नातून आजपर्यंत अनेक विकास कामे केली.
घरोघरी पाणी व्यवस्था , रस्ते , गटार , फवारणी , वेळोवेळी गटार सफाई , स्वच्छता अभियान , आरोग्य शिबीरे , ई.श्रम कार्ड , पी.एम. किसान योजना , शेतकरी पीक विमा , भाजीपाला बियाणे वाटप , शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील बियाणे वाटप , रक्तदान शिबीर , विधवा महिलांना चेकचे वाटप , रवा मैदा वाटप , जेष्ठ नागरिक संघटना – अपंगांना चेकचे वाटप , आदिवासी समाजाला भांडी , सतरंजी वाटप , वाडीत पाण्याची सुविधा उपलब्ध केली , आयुष्यमान भारत योजना , नविन मतदार नोंदनी , ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रतिष्ठित व्यक्तींच्या – सामाजिक संस्थांच्या माध्यमातून किराणा सामान वाटप , कोरोना काळातही एक महिला असूनहि एखाद्या योध्दा प्रमाणे रात्रंदिवस लढल्या जंतूनाशक फवारणी , मास्क वाटप , सॅनेटायझरचे वाटप , अन्नधान्याचे तर आजपर्यंत गावात एवढे वाटप झाले नसेल एवढे वाटप झाले , आपल्या गावाला या महामारी पासून वाचवण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले , गावातील गल्लीबोळात लाईटची सुविधा पोहचविली , वेताळेश्वरा कडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला लावलेल्या पथदिव्यांमुळे ” वेताळी ” हे ठिकाण उजळून निघाले. बँक आपल्या दारी योजना , पोष्ट खात्यातील योजनांची माहिती , चार फाटा मोठे दिवे लावून उजळून टाकले , १५ ऑगस्ट , २६ जानेवारी हे राष्ट्रीय सण साजरे केले , महापुरुषांच्या जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले.
तसेच अनेक शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना जास्तीत जास्त मिळावा , यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो , त्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून , तर कधी वैयक्तिक पातळीवर स्वखर्चाने अनेक उपक्रम राबवित असतात. त्यामुळे त्यांचे कार्य गावास बहरून टाकणारे असून ” रणरागिणी ” सारखे कार्य करणाऱ्या त्यांच्या कार्यास तोड नाही , असेच येथील ग्रामस्थ मत व्यक्त करताना दिसत आहेत.
आजच्या या कार्यक्रमावेळी सरपंच सौ. प्रमिला बोराडे , मा. विभागप्रमुख सुरेश बोराडे , मं.अधिकारी राठोड साहेब , तलाठी माधुरी पाटील , शिपाई सुनिल तात्या तसेच म्हसेदादा व त्यांची टीम , सौ.सानिका वांजळे त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने हालीवली गावातील युवक , युवती , महिला , जेष्ठ नागरिक आदी उपस्थित होते.