वडगाव मावळ : सामाजिक बांधिलकी जपत “मदत नव्हे कर्तव्य” या अंतर्गत मोरया महिला प्रतिष्ठान, मोरया ढोल पथक, राष्ट्रीय भोईसमाज क्रांतीदल परिवार वडगाव मावळ व लोकसहभागातून पूरग्रस्तांसाना मदत म्हणून जीवनावश्यक वस्तू सातारा येथे रवाना करण्यात आल्या.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वडगाव शहरातील नागरिकांनी पुढे यावे असे आवाहन नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे यांनी केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मदतीचा हात देत तांदूळ, गहू, तेल, बिस्कीट बाॅक्स, पाणी बाॅटल, ब्लँकेट, जुने नवीन कपडे, टॉवेल सेट, फरसाण पुडे, मॅगी नूडल्स बाॅक्स, बेसन पीठ इतर अत्यावश्यक साहित्य जमा केले.
यावेळी नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे, मा सरपंच बापूसाहेब वाघवले, मा सरपंच अर्चनाताई भोकरे, भोई समाजाचे उपाध्यक्ष दौंडे, मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा चेतना ढोरे, उपाध्यक्षा अबोली ढोरे, वडगाव शहर युवक काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष यशवंत शिंदे आणि प्रतिष्ठानच्या संचालिका तसेच मित्र परिवार यांच्या उपस्थितीत पूरग्रस्तांसाठी गोळा झालेली मदत पुण्यातील भोई प्रतिष्ठान व एनडीआरएफ दलाची तुकडी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.
तसेच भोई प्रतिष्ठान पुणे यांच्या उपस्थितीत अन्नधान्याच्या गाड्या सातारा जिल्ह्यातील कोयनानगर येथील मीरगाव कडे रवाना झाल्या.वडगाव शहर परिसरातील नागरिकांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ज्यांनी कोणी पूरग्रस्तांना मदत केली आहे.त्या सर्वांचे आभार यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी व्यक्त केले.