
प्रतिनिधी (दत्तात्रय शेडगे)
कर्जतहून खोपोलीच्या दिशेने जात असलेली 8 वाजून 15 मिनिटांची ट्रेन केळवली स्थानका जवळ येत असताना अचानक रुळ तुटल्याचे चालकांच्या लक्षात येताच सावधगीरीने रेल्वे थांबवत याची सर्व कल्पना रेल्वे दिली असता तत्काळ रुल दुरुस्ती काम सुरु करून रेल्वे सेवा पुर्ववत सुरु करण्यात आली.
परंतु याच दरम्यान 12 ते 15 मिनिट रेल्वे सेवा ठप्प झाल्याने अनेक प्रवाशांची सकाळी कामाच्या व्यवस्थापन करण्यात तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
तर चालकांच्या दक्षतेमुळे मोठी दुर्घटना होण्यापासून टळल्याने अनेकांनी चालकांच्या कामाचे कौतुक केले.