Tuesday, May 30, 2023
Homeपुणेलोणावळामनसेच्या 17 व्या वर्धापन दिनानिमित्त लोणावळा मनसेच्या वतीने डॉ. बी. एन. पुरंदरे...

मनसेच्या 17 व्या वर्धापन दिनानिमित्त लोणावळा मनसेच्या वतीने डॉ. बी. एन. पुरंदरे विद्यालयाला टिव्ही भेट…

लोणावळा (प्रतिनिधी): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 17 व्या वर्धापन दिनानिमित्त लोणावळा शहर मनसे कडून डॉ. बी. एन. पुरंदरे विद्यालयाला दूरचित्रवाणी संच (टीव्ही) भेट स्वरूपात देण्यात आला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून डॉ. बी. एन.पुरंदरे बहुविदविद्यालय,लोणावळा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दूरचित्रवाणी संच (टीव्ही) महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहराच्या माध्यमातून देण्यात आला. यावेळी मावळ तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळस्कर तसेच लोणावळा शहराध्यक्ष भारत रमेश चिकणे व रमेशभाऊ म्हाळस्कर यांच्या हस्ते टिव्ही भेट स्वरूपात देण्यात आला.

या प्रसंगी विद्यार्थांमध्ये उत्साह पाहायला मिळाला.यावेळी लोणावळा शहर प्रवक्ते अमित भोसले, निखिल भोसले, उपाध्यक्ष मधुर पाटणकर, सुनिल भोंडवे, चिटणीस निखिल सोमण,संघटक अभिजित फासगे, निलेश लांडगे, अजिंक्य बोभाटे, गौतमजी रावळ, रोहिदास शिंदे,आकाश लोंढे आदी पदाधिकारी व असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page