Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष अमितसाहेब ठाकरे यांचा " वाढदिवस " कर्जतमध्ये उत्साहात...

मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष अमितसाहेब ठाकरे यांचा ” वाढदिवस ” कर्जतमध्ये उत्साहात साजरा !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत उपजिल्हा रुग्णालयात रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना अल्पोपहार , पाणी वाटप करण्यात आले . यावेळी कर्जत तालुका अध्यक्ष महेंद्र निगुडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरचा कार्यक्रम पार पडला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज साहेब ठाकरे व विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित साहेब ठाकरे यांचे विशेष प्रेम कर्जत तालुक्यावर असल्याने येथील मनसे पदाधिकारी व मनसैनिक यांचे त्यांच्याशी अगदी जिव्हाळ्याचे व निकटचे संबंध आहेत . आज आपल्या नेत्याचा वाढदिवस असल्याने साहजिकच त्यांचा वाढदिवस नागरिकांत सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली , कर्जत तालुका अध्यक्ष महेंद्र निगुडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रुग्णांना अल्पोपहार वाटप कार्यक्रमास समीर चव्हाण – तालुका सचिव , राजेश साळुंखे – कर्जत शहर अध्यक्ष , सुप्रिया बारमुख – महिला शहर सचिव , महाराष्ट्र सैनिक महेश लोवंशी आदी पदाधिकारी व अनेक मनसैनिक उपस्थित होते . याप्रसंगी कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे आरोग्य अधीक्षक डॉ. विजय म्हसकर , आरोग्य सेविका सविता पाटील , आदी उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page