Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमनोरुग्नास योग्य वेळी , योग्य विचारांनी उपचार केल्यास ते खात्रीने बरे होवू...

मनोरुग्नास योग्य वेळी , योग्य विचारांनी उपचार केल्यास ते खात्रीने बरे होवू शकतात – समुपदेशक देवश्री जोशी..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) जग जरी खूप मोठ असलं तरी यात जगताना आपल्या सर्वच ईच्छा पुर्ण होतील , हे सांगू शकत नाहीत , तर कधी कधी या ईच्छा पुर्ण होण्यासाठी आपल्याला वागणूक देखील योग्य मिळत नाही , अशा छोट्या छोट्या गोष्टी पूर्ण न झाल्यास नकारार्थी पणात जाऊन लहानपणीच खूप जास्त मनावर आघात होतो आणि तो आघात मनात तसाच साचून ठेवला तर हळूहळू याचे रुपांतर मानसिक आजारात होते . घरामध्ये दोन अपत्य आहे आणि त्यांच्या मध्ये होणारी सतत तुलना , तसेच आई गरोदर असताना तिच्यावर झालेला मानसिक आघात , लग्न झाल्यानंतर होणारी ओढाताण , मनावर आघात होवून झोप अजिबात न लागणे , अचानक आयुष्यामधून जवळची व्यक्ती जाणे , जॉब जाणे , नैसर्गिक आपत्ती ह्या सारखी अशी अनेक कारणांमुळे निराशा पदरी पडून आपल्या वागण्यात अचानक बदल व्हायला लागतो . एकदम हसत खेळत असणारी व्यक्ती अचानक शांत राहणे पसंत करते , एकटं राहून एकांत पसंद करते , अचानक झोप न येणे , तर खूप झोप येणे , या हळुवार होणाऱ्या बदलामुळे मनावर होणाऱ्या त्रासातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला ” समुपदेशकच ” योग्य वेळी , योग्य विचारांनी अशा व्यक्तीस नैराशेतून बाहेर काढण्यासाठी विचार मंथनाची फुंकर मारून सुखरूप बाहेर काढू शकतात , असे महत्त्वपूर्ण मत कर्जतच्या ” मनस्वास्थ्य क्लिनिकच्या ” प्रसिद्ध समुपदेशक ” देवश्री जोशी ” यांनी व्यक्त केले.

त्यांनी ” मानसोपचारतज्ञ आणि समुपदेशक ” अशा मनोरुग्णांवर कसे काम करतात ? याची माहिती देताना म्हटले की , मानसोपचारतज्ञ ( psychiatrist ) म्हणजे मनाचा डॉक्टर त्यांनी MBBS MD in psychiatry या विषयामध्ये पदवी घेतलेली असून पेशंट ला मानसिक आजाराची तीव्रता बघून औषधोपचार केले जातात. ह्यामध्ये डॉक्टर्स पेशंट ला औषध देऊन बरं करतात. यात वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक आजार येतात , जसे की, bipolar ह्यामध्ये मनाची अवस्था खूप जास्त आनंद किंवा खूप जास्त दुःख अशी असते , याचबरोबर schizophrenia ह्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, कोणाला कोणीतरी बोलत असल्याचे भास होतात, कोणाला माणसं दिसतात, कोणाला आपल्या अंगावरून काहीतरी फिरतंय, ह्याप्रकारची लक्षण ह्या आजारांमध्ये असतात , तसेच OCD ह्यामध्ये सतत हात धुणं, दाराला कुलूप लावले आहे , हे माहिती असूनही सतत चेक करणे , एखादी वस्तू जर ३० अशांमध्ये ठेवत असू तर ती तशीच असणं ह्या सारखे अनेक आजार आहेत , त्यामध्ये औषधं देऊनच पेशंट ला आराम मिळतो.

मानसिक आजारांमध्ये खूप महत्वाची गोष्ट म्हणजे मानसिक आजाराच्या गोळ्या ह्या आयुष्यभर घ्याव्या लागतात, जसं कि आपण डायबेटिस किंवा बिपी च्या गोळ्या आयुष्यभर घेतो अगदी तसेच , यावर समुपदेशक देवश्री जोशी यांनी प्रकाश टाकला . मात्र असे मानसिक आजार हे नक्कीच बर होतात पण त्यासाठी डॉक्टर्स आणि समुपदेशन ह्याची जोड असेल तर त्याचा फायदा जास्त होतो. तुम्ही आजाराच्या कुठल्या परिस्थितीमध्ये मदत घेण्यासाठी जात आहात , हे ह्यामध्ये खूप जास्त महत्वाचं असतं. जसं कि कॅन्सर झालेला व्यक्ती कॅन्सर च्या कुठल्या स्टेज ला जातो तसेच मानसिक आजारांचं पण असतं.

मानसिक आजार हे कोणालाही होऊ शकतात , आपण आता वर जी काही लक्षणे बघितली ती सगळी शारीरिक म्हणजे मेंदूमध्ये काहीतरी बिघाड झाल्यामुळे होती, आता यावर समुपदेशकाचा रोल काय ? यावर समुपदेशक देवश्री जोशी सांगतात की , समुपदेशक हे कला विषयातून (आर्टस्) पदवी ( BA ) घेऊन त्यानंतर ( MA ) म्हणजे मास्टर्स डिग्री मध्ये psychology या विषयात पदवी घेतल्याने ह्यामध्ये तुमच्यासोबत काम करून, तुमच्या भाव – भावनापासून ते तुमच्या मनात काय विचार सुरु आहेत , ते कसे असले पाहिजे , आपल्या वागण्याची जबाबदारी कोणाची , इथपर्यंत सगळ्या प्रकारची सहानुभती पूर्वक कॉउंसेलिंग म्हणजे समुपदेशक होय. According to Hodges and Myers in the Encyclopedia of Social Psychology, “Empathy is often defined as understanding another person’s experience by imagining oneself in that other person’s situation: One understands the other person’s experience as if it were being experienced by the self, but without the self actually experiencing it. या आजारात सहानुभूती खूप महत्त्वाची असते , दुसऱ्या व्यक्तीच्या परिस्थितीमध्ये स्वतः आपण त्यात असल्याची कल्पना करून दुसऱ्या व्यक्तीचा अनुभव समजून घेणे , एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीचा अनुभव समजून घेवून तो स्वतः अनुभवत आहे , याचा प्रत्यय घेवून समुपदेशन केले जाते . याच्याशिवाय देखील ” समुपदेशन ” हे कोणीही घेऊ शकतं.

प्रत्येकाच्या मनात राग, दुजाभाव, कुतूहल, आसक्ती, प्रेम, अपेक्षा ह्यासारख्या वेगवेगळ्या भावना असतात. प्रत्येकवेळी सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या तश्या घडतातच असं नाही. खूप वेळा आयुष्यामध्ये अप्रिय, नको असणाऱ्या घटना घडतात त्यामुळे उन्मळून जायला होतं. कोणीच आपलं नाही, मी कोणालाच नको हवी आहे. ह्या सारख्या खूप नकारात्मक भावना मनामध्ये येतात. रोजची काम सुद्धा करताना स्वतः विषयी वाईट वाटते, आयुष्य नको वाटत राहतं, तर अशा सगळ्या भावनापासून वाट दाखवायला मदत करतो तो म्हणजे समुपदेशक . या सर्व गोष्टी आपण आजूबाजूला आम्हाला काय वाटत ते बोलतच असतो की, मग समुपदेशकाकडे का जायचं ?

नक्कीच आजूबाजूच्या लोकांची मदत घेता ते चांगल पण आहे , पण कधीतरी समोरच्याशी बोलून मार्ग न मिळता , आपल्या रागामध्ये अजूनच भर पडते किंवा एखाद्याविषयीच मत अजूनच कलुषित होतं , तर हे असं का होतं तर ती व्यक्ती तुमच्या वर ओढवलेल्या संकटामध्ये कशी वागली असती किंवा वागेल त्याचे नकारार्थी अनुभव तुम्हाला सांगते किंवा कसे वागायचे हे सांगते , पण त्यातून तुम्हाला होणारा मनस्ताप , त्रास त्याच्याशी काहीच त्या व्यक्तीचा संबंध नसतो. समुपदेशक तुम्हाला तुमच्या वागण्याची जबाबदारी, आनंदाची जबाबदारी, रागाची जबाबदारी , आयुष्यामध्ये घडणाऱ्या अप्रिय घटनांना सामोरे कसे जायचे , ह्या सगळ्याची जबाबदारी तुमची कशी आहे, ती कशी पेलायची हे सहानुभुतीपूर्वक, तुम्हाला कुठल्या ही प्रकारचे judge न करता, तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये बोलून दिशा दाखवण्याचं काम समुपदेशक करतो . चांगला समुपदेशक कधीही सल्ला न देता दिशा दाखवण्याचं काम हे करत असतो.
म्हणूनच तुम्हाला कोणाला पण आयुष्याच्या कुठल्या पण वाटेवर समुपदेशकाची गरज असेल , निरोगी शरीर + निरोगी मन = निरोगी माणूस याची सांगड घालायची असेल तर मनस्वास्थ्य क्लिनिक कर्जतच्या प्रसिद्ध समुपदेशक देवश्री जोशी 9527676008 यावर संपर्क करा , आपली समस्या जाणून माफक फि घेवून तुम्हाला निराशेच्या दलदलीतून नक्कीच बाहेर काढले जाईल , हि यशस्वी खात्री , असे मत समुपदेशक देवश्री जोशी यांनी व्यक्त केले .
- Advertisment -

You cannot copy content of this page