Sunday, September 24, 2023
Homeपुणेमावळमयत शिक्षक भाऊ आखाडे यांच्या कुटुंबाला दिली आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट,...

मयत शिक्षक भाऊ आखाडे यांच्या कुटुंबाला दिली आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट, आमदार पडळकर झाले भावुक…

प्रतिनिधी-दत्तात्रय शेडगे

मावळ तालुक्यातील वडेश्वर पठार येथील राहणारे ग्रामस्थ शिक्षक भाऊ आखाडे यांना सर्पदर्श झाल्याने उपचाराअभावी त्यांचा मृत्यु झाला, मात्र त्यांची घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने त्यांच्या घरी जाऊन धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी आखाडे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.

यावेळी आमदार पडळकर यांनी आखाडे कुटूंबियांना आर्थिक मदतही केली, तर उसकान पठार येथील निर्मिती महिला बचत गट यांच्या वतीने आर्थिक स्वरूपात मदत करण्यात आली.


वडेश्वर पठारावर राहणारे शिक्षक भाऊ आखाडे यांना गेल्या महिन्यात रात्री झोपेत असताना सर्पदर्श झाला, मात्र त्यांच्या गावात रस्ताच नसल्याने वेळ खूप गेल्याने उपचाअभावी त्यांचा मृत्यू झाला, भाऊ आखाडे गेल्याने त्यांच्या कुटूंबियांवर मोठे संकट कोसळले असुन त्यांची परिस्थीती अत्यंत हलाखीची आहे.

या घटनेची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांना मिळताच त्यांनी शिक्षक भाऊ आखाडे यांच्या कुटुंबाची भेट घेत त्यांना आर्थिक मदत केली, व कुटूंबाची हलाखीची परिस्थिती पाहिल्याने आमदार पडळकर यांना अश्रू अनावर होऊन ते भावुक झाले, तर येणाऱ्या काळात या कुटूंबाला सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन आमदार पडळकर यांनी आखाडे कुटुंबियांना दिली.

- Advertisment -