Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधत आविष्कार फाउंडेशनच्या वतीने पत्रकारांचा केला सन्मान..

मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधत आविष्कार फाउंडेशनच्या वतीने पत्रकारांचा केला सन्मान..

तालुक्यातील अनेक पत्रकारांचा केला सन्मान..

खोपोली- दत्तात्रय शेडगे

मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधत आज आविष्कार फाउंडेशन इंडिया यांच्या वतीने खालापूर तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.


आज 6 जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधत आविष्कार फाउंडेशन इंडिया सामाजिक व शैक्षणिक संस्था शाखा खालापूर तालुका यांच्या आज खालापूर तालुक्यातील जेष्ठ, युवा पत्रकारांना शाल श्रीफळ व सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला.


यावेळी जेष्ठ पत्रकार जयवंत माडपे, नितीन भावे, अर्जुन कदम, दिलीप पवार, एस टी पाटील, भाई ओव्हाळ, शेखर जांभळे, मेहबुम जमादार, समाधान दिसले, नवज्योत पिंगळे, अंकुश मोरे, काशिनाथ जाधव, आकाश जाधव, तय्यब खान, दत्तात्रय शेडगे, संतोषी म्हात्रे, संतोष गोतारन आदींसह अनेक पत्रकारांचा सन्मान केला.‌


या कार्यक्रमाला खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल, उपाध्यक्षा विनिता कांबळे , गटनेते तथा शिवसेना खोपोली शहर प्रमुख सुनील पाटील, नगरसेविका वनिता काळे, सामाजिक कार्यकर्ते हरीश काळे, आविष्कार फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र फक्के, उपाध्यक्ष प्रशांत गोपाले, सचिव जितेंद्र देशमुख, महिला संघटक कविता खोपकर, जिल्हासचिव दिलीप मोरे ,ताराराणी ब्रिगेडच्या अध्यक्षा वर्षा मोरे यांच्यासह अनेक पत्रकार आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page