Thursday, May 30, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमराठी भाषा गौरव दिनानिमित्त खोपोली मनसे कडून "मी मराठी, माझी स्वाक्षरी मराठी"...

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त खोपोली मनसे कडून “मी मराठी, माझी स्वाक्षरी मराठी” कार्यक्रमाचे आयोजन…

खोपोली (प्रतिनिधी): मराठी भाषा गौरव दिनानिमित्त खोपोली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी मराठी,माझी स्वाक्षरी मराठी ही मोहीम राबविण्यात आली.
कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधून 27 फेब्रुवारी रोजी सर्वत्र मराठी भाषा गौरव दिन आनंदात साजरा करण्यात येतो. याच दिवसाचे औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खोपोली शहर अध्यक्ष अनिल मिंडे यांच्या नेतृत्वाखाली मी मराठी.. माझी स्वाक्षरी मराठी.. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमावेळी उपजिल्हा अध्यक्ष सचिन कर्णुक यांच्या हस्ते स्वाक्षरी फलकाचे अनावरण करण्यात आले. तर अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. यावेळी चिमुकल्यानंपासून ते अगदी वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी मराठी भाषे विषयी असलेले प्रेम स्वाक्षरी करत व्यक्त केले व मनसेने आयोजित केलेल्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.
यावेळी शहर संघटक हुसेन शेख, उपाध्यक्ष निखिल गुरव, मितेश खाडे, अविनाश देशमुख, विभाग अध्यक्ष नितीन सुतक, सतीश येरूनकर, प्रसिद्धी प्रमुख धनंजय अमृते, प्रकाश बावनकर, सुनील मिंडे, शानवाज शेख यांच्या सह मनसे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे आयोजक शहराध्यक्ष अनिल मिंडे यांनी उपस्थित मान्यवर व नागरिकांचे आभार मानले.
- Advertisment -

You cannot copy content of this page