Thursday, September 28, 2023
Homeक्राईममळवलीत एका बंगल्यावर छापा मारून पाच पुरुष व चार महिला असे नऊ...

मळवलीत एका बंगल्यावर छापा मारून पाच पुरुष व चार महिला असे नऊ जणांवर…… लोणावळा ग्रामीण पोलिसांची कारवाई..

मळवली दि. ०९/१०/२०२०: लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील मळवली येथील एका बंगल्यावर पोलिसांनी झापा मारून पाच पुरुष व चार महिलांवर कारवाई करत रोख रकमेसह एकूण 1, 40, 880 / मुद्देमाल जप्त करून तब्बल नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशननी दिलेल्या माहिती नुसार दि. 9 रोजी गुप्त सूत्रांकडून लोणावळा ग्रामीण पोलिसांना खबर मिळाली की मळवली ता. मावळ, जि. पुणे गावच्या हद्दीत असलेला संतोष केदारी यांच्या समृद्धी वीला मध्ये पाच पुरुष व चार महिला असे स्पीकरवर गाणी लावून त्यावर अश्लील पद्धतीने नाचत आहेत. पुरुषांकडून त्या महिलांवर पैसे उधळले जात आहे.
सदर माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे, विजय राहतेकर ( पो. ना. ), शरद जाधवर ( पो. कॉ. ), म. पो. कॉ. रुपाली कोहिनकर व दोन पंच यांनी मिळालेल्या माहितीनुसार 11 :10 वा.च्या सुमारास घटना स्थळी छापा मारला असता मिळालेल्या माहिती प्रमाणे चार महिला स्पीकरवर लावलेल्या गाण्यांवर अश्लील हावभावात नाचत होत्या व तिथे असणारे पाच पुरुष त्यांच्यावर पैसे उधळत असताना पोलिसांना मिळून आले.
त्यावेळी राजेश पारसमल जैन ( रा. लॅमिंग्टन रोड मुंबई ), महेश छगनलाल पोरवाल ( रा. बिजापूर, कर्नाटक ), विनोदकुमार मोहनलाल भन्साळी ( रा. बिजापूर, कर्नाटक ), सचिन रमेश जैन ( रा. बिजापूर, कर्नाटक ), व राकेश मदनलाल पोरवाल (रा. बिजापूर, कर्नाटक ) हे पाच पुरुष व चार महिला मिळून आल्यास त्यांनी त्याठिकाणी उधळलेली रोख रक्कम 50880 / रु. तसेच मोबाईल, स्पीकर असे एकूण 1, 40, 880 / रुपयांचा माल रोख रकमेसह लोणावळा ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे.
पाच पुरुष व चार महिला या सर्वांविरुध्द लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये भा. द. वि. कलम 294, 188, 269, साथीचा रोग नियंत्रण कायदा 1897 चे कलम 3, तसेच म. पो. का. कलम 135, 33(N)131 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत व पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पो. हवा. सिताराम बोकड लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हे करत आहेत.

त्यासंदर्भात ” यापुढे असा प्रकार घडताना मिळून आल्यास संबंधित लोक व बंगला मालक यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल ” असे आवाहन सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी केले आहे.
- Advertisment -