Tuesday, September 26, 2023
Homeपुणेमावळमळवली ते कामशेत दरम्यान रेल्वे महामार्गावर एक अज्ञात तरुणाचा मृतदेह पोलिसांना मिळून...

मळवली ते कामशेत दरम्यान रेल्वे महामार्गावर एक अज्ञात तरुणाचा मृतदेह पोलिसांना मिळून आला….

दि.24/12/20 लोणावळा : रोजी मळवली ते कामशेत दरम्यान रेल्वे मार्गावर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह लोणावळा रेल्वे पोलिसांना मिळून आला आहे. सदर मृतदेहाचि कोणतीही ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.

मळवली ते कामशेत रेल्वे मार्गाच्या दरम्यान दि.24 रोजी सायंकाळी 5: 45 वा. च्या सुमारास कोणत्यातरी अज्ञात रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाला असल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

मिळून आलेल्या मृतदेहाच्या वर्णना व्यतिरिक्त पोलिसांना कुठलीही माहिती मिळाली नसून मिळालेला मृतदेह हा अंदाजे 35 वर्षीय तरुणाचा असून अंगाने सडपातळ, उंची 5 फूट 7 इंच, गौवरणीय, काळे केस, दाढी मिशी दाट असे त्याचे वर्णन आहे. त्याच्या अंगावर पिवळ्या रंगाच्या चौकटी असलेला काळा शर्ट, काळ्या रंगाची फुल पॅन्ट असा पहेनावा असून जर कुणाला ह्या अज्ञात मृतदेहाची ओळख पटली असल्यास लोणावळा रेल्वे स्टेशन पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे. पुढील तपास पोलीस नाईक जाधव करत आहे.

- Advertisment -