Tuesday, September 26, 2023
Homeपुणेमावळमळवली लोहगड व विसापूर मार्गावर लोणावळा पोलिसांची नाकाबंदी....

मळवली लोहगड व विसापूर मार्गावर लोणावळा पोलिसांची नाकाबंदी….

मावळ. ( अष्ट दीशा न्यूज प्रतिनिधी- गणेश कुंभार )लोहगड विसापूर मार्गावर लोणावळा पुणे ग्रामीण पोलिसांकडून मळवली या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मळवली येथे लोहगड विसापूर कडे जाणाऱ्या मार्गावर पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे.पाऊसाळा सुरू झाल्यावर कार्ला, विसापूर, लोहगड या पर्यटन स्थळांवर पर्यटकांची दरवर्षी खुप मोठी गर्दी होत असती.

ह्या वेळी लोणावळा परिसरातील सर्व पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंद केली असता काही पर्यटक छुप्या मार्गाने कींवा पास दाखवुन जान्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे मळवली परीसरात सुद्धा कोरोना रोगाचा प्रसार होवु शकतो ह्या अनुषंगाने ही नाकाबंदी वेहरगाव मळवली , भाजे या ठीकाणी उभारली आहे. मावळ तालुक्यात सुद्धा कोरोना रोगाचा प्रसार दिवसेंदिवस वाढताना दिसत असल्यामुळे नागरीकांनी सुध्दा प्रशासनाला सहकार्य केले पाहीजे. सदर बंदोबस्त लोणावळा ग्रामीणचे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक नीरंजन रनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा परीसर व ग्रामीण भागात विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीसांकडुन नजर ठेवण्यात येत आहे.

- Advertisment -