Sunday, June 23, 2024
Homeपुणेलोणावळामविआ सरकारच्या महाराष्ट्र बंदला लोणावळ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद...

मविआ सरकारच्या महाराष्ट्र बंदला लोणावळ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद…

लोणावळा दि.11: महा विकास आघाडी सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला लोणावळा शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद.तीन कृषी कायद्यांविरोधात लखीमपूरमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राच्या ताफ्यातील वाहनांनी चिरडल्यानंतर हिंसाचार उफाळला. वाहनांखाली चिरडलेल्या चार शेतकऱ्यांसह या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव निखिल कवीश्वर,लोणावळा शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड,राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा शहर अध्यक्ष जिवन गायकवाड, शिवसेना लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, माजी शिवसेना जिल्हाप्रमुख मच्छिन्द्र खराडे, संजय भोईर, राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य बाळासाहेब पायगुडे, शिवसेना वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश केदारी, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष राजू बोराटी, शिवसेना महिला संघटक शादान चौधरी, काँग्रेस गटनेत्या आरोही तळेगावकर, कल्पना आखाडे, सिंधू परदेशी, हमाल व कष्टकरी पंचायत अध्यक्ष राजाराम साबळे, राजू गवळी, संध्या खंडेलवाल, मनीषा भांगरे यांसमवेत महा विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

त्याचे देशभर तीव्र पडसाद उमटले असून आज लोणावळा शहरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील शाळा, मेडिकल व हॉस्पिटल वगळता सर्व बाजारपेठ तसेच गवळीवाडा परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.बंद दरम्यान लोणावळा शहर महा विकास आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे घोषणाबाजी करत लखीमपूर येथील कृत्याचा निषेध करण्यात आला.

- Advertisment -

You cannot copy content of this page