if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
खोपोली(दत्तात्रय शेडगे)
रायगड जिल्ह्यात सद्य पावसाने धुमाकूळ घातला असून सगली कडे अतिवृष्टी झाली यात महाड मध्ये पुराचे पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
यात गोर गरीब सामान्य नागरीकांचे समान वाहून गेल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले यामुळे सामाजिक बांधिलकी जपत एकविरा ग्रुप खोपोलीच्या वतीने धान्य कपडे, जेवण, यांची काल मदत केली.
महाड मध्ये अजूनही दुर्गंधी पसरली आहे तर अनेकांच्या गाड्याही बंद पडल्या आहेत, यामुळे एकविरा ग्रुपने त्यांच्या बरोबर गाड्यांचा मकेनिकल नेऊन काहींच्या गाड्याही दुरुस्त करून दिल्या.यावेळीं एकविरा ग्रुपचे खोपोली अध्यक्ष अक्षय सकपाळ, उपाध्यक्ष विनायक साळुंखे, सदस्य पवन साळुंखे, नरेंद्र मंचल आदीसह अनेक सद्स्य उपस्थित होते.