Saturday, November 2, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमहानगर गँस कंपनीने सामाजिक दातृत्व जपत माणकीवली ग्रामपंचायतीत बसवले वॉटर फिल्टरेशन प्लांट..

महानगर गँस कंपनीने सामाजिक दातृत्व जपत माणकीवली ग्रामपंचायतीत बसवले वॉटर फिल्टरेशन प्लांट..

प्रतिनिधी (दत्तात्रय शेडगे)
खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत माणकीवली हद्दीतील नागरिकांची आरोग्याची काळजी लक्षात येथील सरपंच चंदन भारती, उपसरपंच विकास रसाळ, सदस्य अर्चना पिंगळे, अजय भारती, निलम चोरगे यांनी वेळोवेळी महानगर गँस कंपनीच्या व्यवस्थापनाशी केलेल्या पाठपुराव्या यश आल्याने महानगर गँस कंपनीच्या सीआरएस फंडातून पेयजल योजनेतून फिल्टरेशन प्लांट बसवून या प्लांटचे उघ्दाटन 19 अॉगस्ट रोजी अंजरुण गावात पार पडल्याने या योजनेच्या माध्यमातून माणकीवली ग्रामपंचायतीमधील नागरिकांना शुध्द पाणी मिळणार असून 30 पैसे प्रति लिटर पाणी मिळणार असल्याने गोरगरिबांनी समाधान व्यक्त करीता माणकीवली ग्रामपंचायतीच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

दिवसेंदिवस वेगवेगळ्या आजारांचा नागरिकांना सामना करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये मोठी समस्या उभी राहिली असून अनेक आजार हे दुषित अशुद्ध पाण्यामुळे होत असतात, त्यामुळे बहुतांशी कुटुंबातील सदस्य एक्वा फिल्टर घरात बसवून पाणी पित असतात. परंतु काही कुटुंब आर्थिक दृष्ट्या कमपुवत असल्याने घरात एक्वा फिल्टर बसवणे त्यांना शक्य होत नसल्याने अशी कुटुंब मिळेल तसे पाणी पित असतात.

अशीच समस्या माणकीवली ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांची लक्षात घेत येथील सरपंच चंदन भारती, उपसरपंच विकास रसाळ, सदस्य अर्चना पिंगळे, अजय भारती, निलम चोरगे यांनी ओळखून नागरिकांना शुध्द पाणी मिळावे या दृष्टीने महानगर गँस कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करीर वॉटर फिल्टर प्लांट महानगर गँस कडून मिळावे यासाठी पाठपुरावा केल्याने येथील लोकप्रतिनिधीच्या प्रयत्नांना अखेर यश आल्याने महानगर गँस कंपनीच्या सीआरएस फंडातून पेयजल योजनेतून फिल्टरेशन प्लांट बसवून देण्यात आले असून या प्लांटचे उघ्दाटन 19 अॉगस्ट रोजी अंजरुण गावात पार पडल्याने आता येथील नागरिकांना शुध्द पाणी प्यायला मिळणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून 30 पैसे प्रती लिटर दराने हे शुध्द पाणी नागरिकांना मिळणार आहे.


याप्रसंगी शिवसेना समन्वयक एकनाथ पिंगळे, उपतालुकाप्रमुख संजय देशमुख, सल्लागार शशिकांत देशमुख, कर्जत युवासेना उपतालुकाप्रमुख प्रसाद थोरवे, महानगर कंपनीचे प्रोजेक्ट मँनेजर शरविन फ्रँसिस, पिरमल कंपनीचे प्रोजेक्ट मँनेजर दिपक कळमकर, विभागप्रमुख रोहिदास पिंगळे सरपंच चंदन भारती, उपसरपंच विकास रसाळ, सदस्य अजय भारती, सदस्य अर्चना पिंगळे, युवानेते रोहीत विचारे, सामाजिक कार्यकर्ते अशोक पिंगळे, भानुदास रसाळ, विष्णू भारती, जना कदम, जनार्दन रसाळ, हिरामण कदम, शिवाजी लाले, पुंडलीक रसाळ, चंद्रकांत कोंडे, रमेश कदम, अर्चना पाटील, सुधीर दांडेकर, किशोर लाले, प्रभाकर भोसले आदीप्रमुख उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page