![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी):जोशाबा मजूर कष्टकरी संघटना महाराष्ट्र राज्य, संस्थापक अध्यक्ष मा, कै गणेशजी साबळे या संघटनेच्या वतीने गेली 22 वर्षापासुन छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, व डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा होत असुन या वर्षी जयंती महोत्सवाच्या अध्यक्ष पदी नामदेव शाहू राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जोशाबा मजूर कष्टकरी संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव मोठया दिमाखात व जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. या 2023 च्या जयंती महोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदी नामदेव राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे,यंदाचा जयंतीमहोत्सव मोठ्या थाटामाटात व जल्लोषात साजरा करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष नामदेव राठोड यांनी सांगितले.
तसेच हे विचार पिठ हे गोरगरीब कष्टकरी समाजासाठी असुन गोरगरीब कष्टकरी समाजा पर्यंत ह्या महामानवांचे विचार पोहोचवण्यासाठीच हे विचारपीठ आहे जेणेकरून “शिक्षणा शिवाय प्रगती नाही हे जो पर्यंत त्यांना समजणार नाही तो पर्यंत त्यांचा विकास होणार नाही हे अंतिम सत्य आहे” विद्ये विना मति गेली, मति विना निती गेली,निती विना गती गेली,गति विना वित्त गेले ,ईतके अनर्थ एका अविद्येने केले,हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार सर्वसामान्य जनते पर्यंत पोहचले पाहिजेत या साठीच आम्ही काम करत असल्याचे जयंती महोत्सव अध्यक्ष नामदेव राठोड व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अंकुश चव्हाण यांनी सांगितले.