लोणावळा दि.28 : लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तब्बल नऊ हॉटेल चालकावर केले गुन्हे दाखल.कोरोणा या रोगाचा फैलाव कमी करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी सो. पुणे, यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या बैठक हॉटेल , विष्णुजीकी रसोई हॉटेल, सातबारा हॉटेल, करिष्मा धाबा, आस्वाद हॉटेल, जय मातादी हॉटेल, ग्रीनफिल्ड हॉटेल, तेजस ढाबा या सर्व हॉटेल चालकांवर लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला भारतीय दंड संहिता कलम 269,188 साथीचे रोग प्रतिबंधात्मक कायदा कलम 3 नुसार गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
सदर कारवाई मा. सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर , सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने, पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, पोलीस नाईक शरद जाधवर, अमित ठोसर, पो. शिपाई स्वप्नील पाटील, हनुमंत शिंदे यांनी ही कारवाई यांच्या पथकाने केली असून.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय मुजावर लोणावळा ग्रामीण यांनी सर्व हॉटेल चालक तसेच दुकानदार चालकांना रात्रीच्या वेळेत हॉटेल व दुकाने बंद करण्या बाबत आवाहन केले आहे. पुढेही सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास अधिक कडक कारवाई करण्यात येईल असे त्यांनी बोलताना सांगितले.