खोपोली (दत्तात्रय शेडगे)धनगर समाजाच्या न्याय हक्कांसाठी लढणारी महाराष्ट्र क्रांती संघटना संपूर्ण महाराष्ट्रात काम करत असून रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुकाअध्यक्ष पदी संतोष रामभाऊ बोडेकर यांची नुकतीच निवड करण्यात आली.
धनगर समाजाचे नेते स्वर्गीय बी के कोकरे आणि स्वर्गीय रामभाऊ आखाडे यांच्या यांच्या विचारांशी प्रेरीत होऊन ही संघटना महाराष्ट्रात काम करत असुन काम करत आहेत तर धनगर समाजाचे नेते व माणगाव ग्रामपंचायतचे सदस्य संतोष रामभाऊ बोडेकर यांची महाराष्ट्र क्रांती संघटेनेच्या सुधागड तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
स्वर्गीय बी के कोकरे आणि रामभाऊ आखाडे यांचे विचार समाज बांधवांच्या घरोघरी पोहचवून रायगड जिल्ह्यात संघटना वाढीसाठी जोरदार प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष संतोसग बोडेकर यांनी सांगितले.