महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विद्युत वाहक पोळ व तारेची आणि विद्युत पेटीची दुरुस्तीची मागणी ……

0
150

दि.25 कर्जततालुक्यातील उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील विजेच्या तारा आणि विद्युत वाहक पोळ आणि निकामी झालेली विद्युत पेटी दुरुस्ती करणयात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महावितरण अभियंता यांना लेखी निवेदन देणायत आले आहे.

तसेच उमरोली गावातील बहुतांश विजेच्या तारा जीर्ण झालेले आहे.यावेळी उमरोली मधील भगवान गायकर ते मनोज गायकर फार्म हाऊस ते भरत घारे आणि राम पवार अशाप्रकारे आदिवासी वाड्या वस्ती पर्यंत विजेच्या तारा संपूर्ण निकामी झाले आहे.

त्याठिकाणी दुर्घटना होणाची दाट शक्यता आहे.तसेच महाविरण कंपनीने या समस्याचे निवारण लवकरात लवकर बसविणायत यावे अशी मागणी करण्यात आली आहे.त्याठिकाणी जुने सिमेंटचे जीर्ण झाले आहे.

यावेळी महावितरण कंपनीने नवीन विद्युत वाहक पोळ आणि विजेची तार बसून भविष्यात होणारी जी दुर्घटना होणार नाही,आणि निकामी झालेली विद्युत पेटी ही लवकरात लवकर बसविण्यात यावी अशी रास्त मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी कर्जत महावितरण कंपनी उपकार्यकारी अभियंता प्रकाश देवके यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लेखी निवेदन देऊन उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमरोली अध्यक्ष पंकज बुंधाटे,उपाध्यक्ष तेजस तुपे,सचिव शैलेश घारे,सचिन गायकर इत्यादी आदी सह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.