Wednesday, May 29, 2024
Homeपुणेमावळमहाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्ला कुरवंडे जिल्हा परिषद गटातील कार्यकारिणी जाहीर..

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्ला कुरवंडे जिल्हा परिषद गटातील कार्यकारिणी जाहीर..

मावळ (प्रतिनिधी):महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुका कार्ला- कुरवंडे जिल्हा परिषद गटातील कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
शनिवार दिनांक 1 एप्रिल रोजी मावळ तालुका अध्यक्ष रुपेश शंकरराव म्हाळस्कर यांचे हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांची जाहीर निवड करण्यात आली. पक्षबांधणी व पक्षविस्तार करण्याच्या दृष्टीने या नियुक्त्या करण्यात आल्या असून यावेळी मार्गदर्शन करताना ग्रामीण भागात गावोगावी मनसे शाखा स्थापन कराव्यात यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असे आव्हान करण्यात आले.या प्रसंगी तालुका उपाध्यक्ष अनंता तिकोणे व कोअर कमिटी सदस्य सुरेश जाधव,तानाजी तोडकर,संग्राम भानुसघरे, पौरस डुकरे आदी जण उपस्थित होते.
नवनियुक्त कार्यकारणी पुढीलप्रमाणे कार्ला पंचायत समिती गण विभाग अध्यक्षपदी -अंकुश कचरे, विभाग उपाध्यक्षपदी – इक्तियार इनामदार, नाथा पिंपळे,गट अध्यक्षपदी – वैभव तिकोणे, दिनेश पठारे, विठ्ठल ढाकोळ,मंगेश फाटक तर कुरवंडे पंचायत समिती गण विभाग अध्यक्षपदी -राजू भानुसघरे,विभाग उपाध्यक्षपदी -रविंद्र खांडेभरड, नामदेव बोत्रे व गट अध्यक्षपदी -अमित बोरकर आदींची निवड करण्यात आली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page