Tuesday, September 26, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडमहाराष्ट्र मंडळाच्या वतीने आदिवासीना जीवनश्यक वस्तूचे वाटप, 200 कुटूंबानी घेतला लाभ..

महाराष्ट्र मंडळाच्या वतीने आदिवासीना जीवनश्यक वस्तूचे वाटप, 200 कुटूंबानी घेतला लाभ..

आदिवासीना जीवनश्यक वस्तूचे वाटप, 200 कुटंबांना महाराष्ट्र मंडळ केला अन्नधान्याचा वाटप, विडिओ पहा..

दत्तात्रय शेडगे खालापूर

महाराष्ट्र मंडळ गोरेगाव मुबंई यांच्या वतीने खालापूर तालुक्यातील हाल आदिवासी वाडी, व बैद्ध वाडा येथील सुमारे 200 गोर गरीब कुटूंबाना जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आल्या,देशात कोरोना व्हायरल ने थैमान घातले असल्याने देशात लॉक डाऊन जाहीर असल्याने कंपन्या व उधोग धंदे सगळे बंद असल्याने गोर गरीब आदिवासी बांधवांचे अतोनात हाल झाले आहेत.

याची दखल महाराष्ट्र मंडळ गोरेगाव मुबंई यांनी घेतली असून आज त्यांनी खलापूरातील हाल आदिवासी वाडी, व बौध्दवाडा येथील गोर गरीब गरजू सुमारे 200 कुटूंबाना तांदुळ, डाळ आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
हे मंडळ दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवित असून या मंडळाचे हे 73 वे वर्ष आहे,यावेळी महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष,रमाकांत थोरवे, कार्यवाह अजय सावंत, खजिनदार रविंद्र मातोंडकर, पंकज दळवी, समीर नाईक, नरेश सावंत ,संदीप सावंत शिवसेना चौक जिल्हा परिषद विभाग प्रमुख हुसेन खान ,हाल ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच अजीम मांडलेकर, ग्रामपंचायत सदस्य रवी वाघमारे,चंदर वाघमारे साचीन क्षीरसागर, तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते रामदास करकरे, मंगेश क्षीरसागर, प्रशांत जाधव आदी उपस्थित होते
- Advertisment -