Thursday, September 28, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडमहाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार संघाच्या सरचिटणीसपदी आनंद माने..

महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार संघाच्या सरचिटणीसपदी आनंद माने..

खोपोली( दत्तात्रय शेडगे)महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार संघाच्या महाराष्ट्र राज्याच्या सरचिटणीसपदी कामगार नेते आनंद माने यांची नुकतीच निवड करण्यात आली
गेल्या दहा वर्षापासून कामगार चळवळीत काम करणारे , गोरगरीब, कामगार माथाडी कामगार यांच्यासाठी झटणारे कामगार नेते आनंद माने यांची आमदार बाळाराम पाटील यांच्या महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार संघ यांच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली.


या निवडीने नवी मुबंई, रायगड, पालघर यांच्यासह महाराष्ट्रातील कामगार वर्गात एक नवं चैत्यन पसरले आहे गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांसाठी झटणारा कामगारांच्या समस्यांची जाणीव असलेल्या कामगार नेत्याच्या कामाची दखल घेऊन त्यांना आज हे पद देण्यात आले असून कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याची नवनिर्वाचीत सरचिटणीस आनंद माने यांनी सांगितले.

- Advertisment -