महाराष्ट्र वाहतूक सेना पुणे जिल्ह्याच्या वतीने IPS नवनीत कॉवत व पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांना शुभेच्छा देण्यात आल्या..

0
90

लोणावळा : महाराष्ट्र वाहतूक सेना पुणे जिल्ह्याच्या वतीने लोणावळा उपविभागीय सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत व लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांचा सत्कार करण्यात आला.


IPS नवनीत कॉवत यांची उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक पदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा, शाल पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तर लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक पदी नव्याने पदभार सांभाळणारे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. IPS नवनीत कॉवत यांनी लहान वयात मोठी ख्याती व सामान्य नागरिकांमध्ये प्रेमळ आणि कार्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख निर्माण केल्याने अनेक स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आज महाराष्ट्र वाहतूक सेना पुणे जिल्ह्याच्या वतीने IPS नवनीत कॉवत व पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांना राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट देण्यात आली यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष, शिवसेना संपर्क प्रमुख महेश केदारी, शहराध्यक्ष शांताराम कडू, दत्तात्रय शिगारे,गणेश कदम व भाऊ मावकर सह मान्यवर उपस्थित होते.