Saturday, September 21, 2024
Homeपुणेवडगावमहाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान स्पर्धेत पाच जिल्ह्यांचा एक विभाग असलेल्या पुणे...

महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान स्पर्धेत पाच जिल्ह्यांचा एक विभाग असलेल्या पुणे विभागात वडगाव नगरपंचायतचा द्वितीय क्रमांक…

वडगाव राज्य सरकारच्या महत्वकांक्षी असलेल्या माझी वसुंधरा अभियान या स्पर्धेचा निकाल ५ जून पर्यावरण दिनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीत आॅनलाईन पद्धतीने जाहीर झाला.


यात नव्याने स्थापन झालेली वडगाव नगरपंचायत चा महाराष्ट्र राज्यामध्ये गुण क्रमांकानुसार नववा तर शासकीय निर्देशानुसार जिल्ह्याचा एक विभाग अशी रचना असलेल्या पुणे विभागात वडगाव नगरपंचायतने दुसरा क्रमांक पटकावला आहे. केंद्र शासनाच्या सर्व स्वच्छ सर्वेक्षण या स्पर्धेसाठी वडगाव नगरपंचायत स्थापन झाल्यापासून स्वच्छता विषयक कामे तसेच आरोग्य विषयक उपक्रम राबवण्यास सुरुवात केली होती.


महाराष्ट्र शासनाने गेल्या वर्षी सुरू केलेल्या माझी वसुंधरा अभियानात प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव नगरपंचायत सहभागी झालेली होती त्यानुसार शहरात निसर्गाशी निगडीत असलेली कटिबद्धता निश्चित करण्यासाठी पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्वानुसार पर्यावरण व वातावरणीय बदल या संबंधित स्वच्छताविषयक कामे तसेच उपक्रम राबवण्यास सुरुवात केली.

माझी वसुंधरा अभियान राबवण्यात आलेल्यामध्ये ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद व अमृत शहरे असे गट होते, या अभियान गट 2 म्हणजेच नगरपंचायत गटात राज्यातील एकूण 132 नगरपंचायत यांचा सहभाग होता. यात वडगाव नगरपंचायतने शहरातील शौचालयांचे नूतनीकरण केले असून शहरातील मुख्य भागातील दर्शनीय भिंतींवर स्वच्छतेचे संदेश देणारे रंगकाम करणे, विहिरी-नाले पुनरुज्जीवन करणे, एका प्रभागात लहान मुलांसाठी दर्जेदार उद्यान तयार केले, खेळ रंगला स्वच्छतेचा अंतर्गत घरची परसबाग तयार करणे, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवणे, ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे याविषयी जनजागृती मोहीम, १००० कचरा डस्टबिन पुरविणे, पर्यावरण पूरक चित्रकला, वक्तृत्व व निबंध स्पर्धांचे आयोजन, प्रदुषण मुक्त पर्यावरण पुरक सायकल रॅलीचे आयोजन, शहरातील नागरिकांना सहभागी करून हरित शपथ घेणे, शहर परिसरात नगरपंचायत कर्मचारी यांचे मार्फत नित्यनेमाने साफसफाई करणे. तसेच अशा अनेक उपक्रमात शहरातील नागरिकांना सहभागी करून घेत वडगाव नगरपंचायतने यशाचे शिखर गाठले असून अशा अनेक प्रकारच्या कामांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत १३२ नगरपंचायती मधून आपल्या वडगाव नगरपंचायतने ९ वा क्रमांक पटकाविला आहे.


या सर्व कामात नगरपंचायत मधील सर्व अधिकारी तसेच कर्मचारी वर्ग हिरिरीने कामात सहभाग नोंदवत असत. या कामी सर्व नगरसेवक, नगरसेविका तसेच वडगावकरांचे मोलाचे सहकार्य लाभले. अशी माहिती नगराध्यक्ष मयूर ढोरे, मुख्याधिकारी सुवर्णा ओगले शिंदे, उपनगराध्यक्ष प्रमिला बाफना, आरोग्य सभापती माया चव्हाण यांनी दिली.

- Advertisment -

You cannot copy content of this page