महाविद्यालयीन तरुणीचा रेल्वेखाली आत्महत्येचा प्रयत्‍न, मोटरमनमुळे जीव वाचला…

0
121

प्रतिनिधी (दत्तात्रय शेडगे)
खोपोली दि.23.आई बरोबर झालेल्या भांडणाच्या रागातून वांगणी येथील 19 वर्षीय तरुणीने खोपोलीत रेल्वेखाली जीव देण्याचा प्रयत्न केला परंतु मोटरमनचा प्रसंगावधानामुळे तरूणीचा जीव वाचला. केवळ पाच टाक्या वर निभावले आहे. वांगणी पाषाण रोड येथे राहणारी सोनी सूर्यकांत धायवड ही तरुणी आईबरोबर किरकोळ भांडणाचा राग मनात ठेवून रेल्वेने खोपोली येथे आली.

संध्याकाळी खोपोली रेल्वे स्थानकातून 4:20 वाजता सुटणारी रेल्वे खाली तिने जीव देण्याचा प्रयत्न केला. खोपोली प्लॅटफॉर्मच्या थोडे पुढे रूळावर सोनी मधोमध आडवी झाली होती. रेल्वे स्थानकातून गाडी पुढे वेग घेत असतानाच रुळावर कोणीतरी व्यक्ती पडल्याचे मोटरमनच्या लक्षात आले.

मोटर मनने प्रसंगावधान राखत गाडीचा वेग कमी करत जेमतेम रेल्वे उभी केली. सोनी दोन्ही रुळाच्या मध्ये असल्याने जीव वाचला. घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्तांना मदत पथकाचे गुरुनाथ साटेलकर ,निखिल ढोले, तेजस दळवी, सुनिल पुरी, निलेश आवटी मदतीसाठी तात्काळ पोचले. सोनीच्या डोक्याला थोडा मार लागल्यामुळे रक्त वाहत होते. तातडीने खोपोली नगरपरिषदेच्या रुग्णालयात उपचाराकरता नेण्यात आले. सोनीच्या आई-वडिलांशी संपर्क साधण्यात आला असून खोपोली पोलीस सविस्तर माहिती घेत आहेत.