Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमहा आघाडीचे उमेदवार संजोग भाऊ वाघेरे यांच्या प्रचारात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे...

महा आघाडीचे उमेदवार संजोग भाऊ वाघेरे यांच्या प्रचारात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मैदानात !

मावळमध्ये हक्क अधिकारासाठी व संविधान बचावासाठी मशाल पेटवा…

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे) आताची हि लढाई वेगळी आहे , महागाई – भ्रष्टाचार – महिलांची असुरक्षितता – देशाचे संरक्षण – हुकुमशाही या विरोधात तुम्हाला आपले संरक्षण करायचे असेल तर महा विकास आघाडीचे उमेदवार संजोग भाऊ वाघेरे पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या , असे आवाहन आज कर्जतमध्ये आयोजित केलेल्या महा विकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचार सभेत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सर्व मतदारांना आवाहन केले . यावेळी कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौक गर्दीने तुडुंब भरला होता.

गुरुवार दिनांक ९ मे २०२४ रोजी महा विकास आघाडीचे उमेदवार संजोग भाऊ वाघेरे पाटील यांच्या प्रचार सभेत व्यासपीठावर शिवसेना नेते सचिन भाऊ अहिर , शिवसेना रायगड संघटक बबन दादा पाटील , संपर्क प्रमुख किशोरी पेडणेकर , शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत , शिवसेना महिला आघाडी संघटीका सुवर्णा जोशी , कम्युनिस्ट पक्षाचे गोपाळ शेळके , आप चे जिल्हाध्यक्ष शेखर जांभळे , काँग्रेसचे श्रीरंग बरगे , दिना देशमुख , शिवसेनेचे कर्जत ता. प्रमुख उत्तम शेठ कोळंबे , खालापूर ता. प्रमुख पिंगळे , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा राजिपचे मा. अध्यक्ष सुरेश दादा टोकरे , शहर प्रमुख निलेश घरत , कर्जत शहर अध्यक्ष भाऊ मोरे , शेकाप चे कांबळे , राजाराम शेळके , त्याचप्रमाणे दोन्ही तालुक्याचे आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी , महिला आघाडी , युवा सेना , मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे म्हटले की , भाजप चारशे पार काय २०० पार पण करू शकणार नाहीत , तुम्हाला आमिष देण्याचा प्रयत्न करतील , पण तुम्ही भुलू नका , असे आवाहन करत सर्व देशात भाजपाची हार होणार आहे . यावर प्रकाश टाकत काश्मीर मध्ये 370 कलम काढण्यात शिवसेनेचा देखील पाठींबा होता , मात्र तेथे अजूनही सुरक्षा नाही , म्हणूनच जात – पात – धर्म बाजूला ठेवा , मत मशाल ला द्या , असे भावनिक आवाहन त्यानी केले . भाजपाने महाराष्ट्रासाठी काहीच केले नाही , सर्व उद्योग गुजरातला पाठविले , त्यामुळे लाखो तरुणांना बेरोजगार केले , ही लढाई माझ्या एकट्याची नाही , संपूर्ण महाराष्ट्राची लढाई आहे , यात तुम्ही उतरा , कारण स्वप्न तुमचे चिरडले जातात , महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे , कर्नाटक येथील भाजपाचा पदाधिकारी लैंगिक अत्याचार करून व्हिडिओ क्लिप बनवतो , आणि त्याला भाजप साथ देते , अशी माहिती देत आजही आपल्या खात्यात १५ लाख आले नाहीत , हे संविधान बदलणारे आहेत , म्हणूनच ही लढाई आता देशाचे संरक्षण करण्याचे आहे , यावर प्रकाश टाकला . ते कोण सांगणार हे खा , ते खा , हे घाला ते घाला , म्हणून हुकुमशाही घालविण्यासाठी संविधान वाचवा , असे आवाहन त्यांनी सर्वाँना केले.
आपण सर्व डॉ बाबासाहेब आंबेडकर व घटना प्रेमी आहोत , म्हणूनच मावळ लोकसभा मतदार संघाचे महा आघाडीचे उमेदवार संजोग भाऊ वाघेरे पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या , असे आवाहन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले . यावेळी जनसमुदायाने टाळ्यांच्या गजरात त्यांना साथ दिली.

यावेळी जिल्हा संघटिका सुवर्णा जोशी यांनी रात्र वैऱ्याची आहे , सावध रहा , महागाई वाढवली , सर्वाँना समजावून सांगा , आपली मशाल निशाणी सांगा , जेष्ठ नागरिकांना रेल्वेच्या सेवेत मुभा मिळावी , अशी मागणी त्यांनी केली . श्रीरंग बर्गे ( काँग्रेस ) यांनी आज भ्रष्टाचारीचां मुखिया कोण तर मोदी आहे , भ्रष्टाचारी आमदारांना भाजपात घेतले गेले , जुमलेबाजी – फसवणूक सुरू आहे , यावर त्यांनी प्रकाश टाकला , तर आमच्या काँग्रेसमध्ये एक ही भ्रष्टाचारी नाही , असे ठणकावून सांगत आपण सर्वांनी संविधान वाचविण्यासाठी एकत्र या , गद्दारांना गाडा , या मतदार संघात महेंद्र थोरवे , सुरेश लाड , वसंत भोईर , बंधू पाटील हे पक्ष सोडून गेले , याची आठवण त्यांनी सर्वाँना करून दिली.

यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे गोपाळ शेळके , काँग्रेसचे दिनानाथ देशमुख , आप चे जिल्हाध्यक्ष शेखर जांभळे , यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले . यावेळी धर्म निरपेक्ष पार्टी व स्त्री गर्जना जागृती महासंघाच्या वतीने महा विकास आघाडीचे उमेदवार संजोग भाऊ वाघेरे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला . पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष संतोष सागवेकर , व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा प्रिया कर्दळे हे उपस्थित होते . या ऐतिहासिक सभेचे सूत्रसंचालन संदीप बोराडे यांनी केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page