महिंद्रा सँनिओ कारखान्यातील कामगारांनी मनसेचे प्रतिनिधित्व स्विकारताच 43 कामगारांना कामावरून काढले.

0
95

खोपोली ( दत्तात्रय शेडगे)
खोपोली शहरात सन-1960 साली पोलदनिर्मीती करणाऱ्या (महिंद्रा) महिंद्र सँनिओ या नामांकित कारखान्यातील कामगारांना कायद्याने मिळणारे त्यांचे हक्क व सेवा सुविधांपासून वंचित ठेवल्याने या कामगारांनी आपल्या अन्यायाला वाचा फुटावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना युनियनचे एकूण 450 कामगारांनी नेतृत्व 3 अॉगस्ट रोजी स्विकारले असताच 4 अॉगस्ट रोजी याच युनियनमधील जवळपास 43 कामगारांना कंपनी व्यवस्थापनाने अचानकपणे कामावरून काढल्याने कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होताच.

सर्व कामगारांनी मनसे नेत्यासह कंपनी गेटसमोर ठिय्या आंदोलन करित त्वरीत 43 कामगारांना कामावर घ्या निर्धार केला. असून कामगारांना कामावर न घेतल्यास मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसे नेते महेश सोंगे व सतिष येरुणकर यांनी दिला असून कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास याठिकाणी कंपनी व्यवस्थापन विरुध्द मनसे असा संघर्ष वाढणार हे निश्चित.

खोपोलीतील महिंद्र सँनिओ या नामांकित कारखान्यात मोठ्या प्रमाणात कामगार काम करीत असून कायमस्वरूपी व कंत्राटी कामगार अनेक वर्षापासून काम करीत असताना काही कामगारांवर कंपनी व्यवस्थापन आणि ठेकेदार दबाव टाकत अन्याय करीत असताना या कामगारांना समान काम, समान वेतन मिळत नसून या कामगारांचे कंपनी व्यवस्थापनाकडून सेवा सुविधा वंचित ठेवल्याने आपल्या अन्यायाला वाचा फुटावी म्हणून जवळपास 450 कामगारांनी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यावर प्रेरीत होऊन.

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे प्रतिनिधित्व महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना संयुक्त सरचिटणीस सचिन गोळे यांच्या उपस्थितीत 3 अॉगस्ट स्विकारले असताना 4 अॉगस्ट रोजी कंपनी व्यवस्थापनाने याच युनियमनमधील जवळपास 43 कामगारांना अचानकपणे कामावरून काढल्याने 4 अॉगस्ट रोजी पहिल्या शिपला आलेल्या कामगारांना कंपनी गेटच्या बाहेर काढल्याने कामगारांनी तीव्र संताप व्यक्त केला असता कामगारावर न्याय मिळावा म्हणून मनसे नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत कंपनी गेट समोर ठिय्या आंदोलन करित कामगारांना कामावर रूजू करू घ्या अशी मागणी केली.

जर कामगारांना लवकरात लवकर कामावर रूजू करून न घेतल्यास मनसे आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे मनसे नेत्यांवी मत व्यक्त केले.या आंदोलनावेळी मनसे नेते महेश सोगे, सतिष येरुणकर, अविनाश देशमुख, अनिल मिंडे, संजय दळवी, सतिष घोंडविंदे, बाळा दर्गे आदीसह मोठ्या संख्येने कामगार वर्ग उपस्थित होता.

यावेळी मनसे नेते सतिष येरुणकर म्हणाले की, कामगारांनी मनसे प्रतिनिधित्व स्विकारताच कंपनी व्यवस्थापनाचे दाबे दणाणल्याने मनसे प्रतिनिधित्वामुळे कंपनीकडून कामगारांवर दबाव आणून त्यांच्या हक्कांवर गदा आणू पाहत आहे हा अन्याय सहन केला जाणार नसून वेळ पडल्यास आम्ही रस्त्यावरील लढाई लढू व कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी व्यवस्थापनाला मनसे स्टाईलने धडा शिकविण्यात येईल तसेच कारखान्यातील कामगारांवरील होणारे अन्याय सहन केले जाणार नाही असा असे मत मनसे नेते येरुणकर यांनी व्यक्त केले.