Tuesday, May 30, 2023
Homeपुणेतळेगावमहिला दिनानिमित्त तळेगाव येथे रक्तदान शिबीर व महिलांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन…

महिला दिनानिमित्त तळेगाव येथे रक्तदान शिबीर व महिलांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन…

तळेगाव (प्रतिनिधी):विजया डायग्नोस्टिक सेंटर व तळेगाव लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त रक्तदान तथा गर्भवती स्त्रियांसाठी विशेष शिबिराचे आयोजन दि.8 रोजी करण्यात आले होते.
यावेळी तळेगाव लायन्स क्लबचे अध्यक्ष मयूर राजगुरव यांनी सर्व उपस्थितांच स्वागत केलले,तसेच एक नारी विविध नात्याने मनुष्य जीवन कसे समृद्ध करते याचेही अत्यंत मधाळ शब्दातून आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर प्रास्ताविक करत असताना ज्येष्ठ लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारी म्हणाले की “आजच्या या समारंभाचे दोन विशेष भाग आहेत, एक म्हणजे रक्तदान जे सर्वात श्रेष्ठदान आहे ते आपण करणार आहोत, तर समारंभाचा दुसरा भाग म्हणजे गर्भवती मातेने आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी कशाप्रकारे घ्यावी हे तज्ञांकडून आपण जाणून घेणार आहोत, त्याबरोबरच सोनोग्राफीच्या माध्यमातून होणार बाळ आरोग्य संपन्न आहे किंवा नाही ? याचेही ज्ञान आपण अवगत करणार आहोत म्हणून हा एक विशेष समारंभ जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज आपण आयोजित केलेला आहे. या दूरगामी फलद्रूप ठरणाऱ्या समारंभास डॉक्टरांनी मनापासून शुभेच्छा दिल्या.

यानंतर विजया डायग्नोस्टिक सेंटरच्या रेडिओलॉजिस्ट डॉक्टर दिपाली झंवर यांनी गर्भवती स्त्रियांच्या दृष्टीने सोनोग्राफीचे किती महत्त्व आहे हे अनेक उदाहरणाद्वारे उपस्थित महिलांना समजावून सांगितले,गर्भधारणेच्या पाचव्या महिन्यातच जन्माला येणाऱ्या अर्भकाच्या बौद्धिक आणि शारीरिक व्यंगाची पूर्ण कल्पना या सोनोग्राफीत आपल्याला येऊ शकते, एवढेच नव्हे तर नैसर्गिक किंवा आवश्यक शस्त्रक्रिये शिवाय आपण डिलिव्हरी करू शकतो का? याचा निर्णय सोनोग्राफीच्या रिपोर्टद्वारा आपण घेऊ शकतो. शेवटी आपण स्वतः आणि इतरांनाही गर्भलिंग परीक्षा कधीच करू देणार नाही ही शपथ उपस्थित महिलांना डॉक्टर दिपालींनी आपल्या मनोगतात दिली.
गर्भवती स्त्रिया आणि स्त्रियांच्या विविध आजारात फिजिओथेरपी या क्षेत्रात उच्चपदवी संपन्न केलेल्या डॉक्टर गिरीजा पाठक मोघे यांनी गर्भवती स्त्रियांनी करावयाचे व्यायाम आणि घ्यावयाचा आहार यावर अत्यंत मौलिक विचार आपल्या मनोगतात प्रात्यक्षिकासह व्यक्त केले. लायन् राधेश्याम भंडारी यांनी अत्यंत खुशखुशीत शब्दात सूत्रसंचालन केल्याने समारंभाची उंची वाढली.
पिंपरी चिंचवड ब्लडबँकेचे युवराज बडगुजर यांनी उपस्थितांना आवाहन केल्यानंतर एकूण 21 रक्तदात्यांनी रक्तदान केल्याने रक्तदानशिबिर हेही खऱ्या अर्थाने यशस्वी झाले.तसेच लायन अनिता बाळसराफ यांनी अत्यंत मोजक्या मधुरशब्दातून आभार व्यक्त केल्या नंतर, अल्पोपहराने या समारंभाची सांगता झाली.

You cannot copy content of this page