Tuesday, May 30, 2023
Homeपुणेमावळमहिला रिक्षा चालक अविशा जाधव यांना रमाईची लेक, भीमाची वाघीण 2023 हा...

महिला रिक्षा चालक अविशा जाधव यांना रमाईची लेक, भीमाची वाघीण 2023 हा पुरस्कार प्रदान…

मावळ (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त “माय रमाई फाउंडेशन ट्रस्ट”यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रमाईची लेक,भीमाची वाघीण, गायक, कवी 2023 हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला.यावेळी लोणावळ्यातील महिला रिक्षा चालक अविशा जाधव यांना हा पुरस्कार प्रदान करून गौरवीण्यात आले.
माय रमाई फौंडेशन ट्रस्ट आयोजित पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या महिलांना रमाईची लेक, भीमाची वाघीण असे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तसेच यावेळी उत्कृष्ट गायक व कवी यांना देखील हा पुरस्कार प्रदान करण्यात आले. माय रमाई फौंडेशन ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष डॉ अमर चौरे व मावळ तालुकाध्यक्षा मंगल अमर चौरे यांच्या हस्ते हा पुरस्कार व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी माय रमाई फौंडेशन ट्रस्टचे सर्व आजी माजी पदाधिकारी व महिला भगिनी मोठया प्रमाणात उपस्थित होते.अगदी उत्सहात हा पुरस्कार सोहळा पार पडला.

You cannot copy content of this page