महिला सक्षमीकरण अंतर्गत मीरा महिला बहूउद्देशीय संस्थेच्या प्रशिक्षण संस्थेमध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

0
236

लोणावळा महिला सक्षमीकरण हा खूप महत्वपूर्ण मुद्दा असून त्या अंतर्गत लोणावळा शहर व ग्रामीण भागातील सुशिक्षित आणि असुशिक्षित महिलांना घरबसल्या व्यवसाय सुरु करण्याचे प्रशिक्षण लोणावळा गुरववस्ती येथील रेश्मा शेख यांनी मीरा महिला बहूउद्देशीय सेवा भावी संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहे.मीरा बहूउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून गृह उपयोगी वस्तू बनविणे व त्यापासून महिलांना घरगुती रोजगार कसा करता येईल यासंदर्भातील प्रशिक्षण देत आहेत.सध्या महिला सक्षमीकरण हा महिलांप्रति खूप मोठा मुद्दा आहे.

लोणावळा परिसरातील अनेक गरजू महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहत परपंच सांभाळण्यासाठी व घरात बसून आपल्या परिवारासाठी आर्थिक सहकार्य करण्याची इच्छा असते परंतु सर्वच महिलांना घराबाहेर पडून नोकरी करणे शक्य होत नाही. अशा महिलांना घरबसल्या रोजगार करण्याचे प्रशिक्षण याठिकाणी देण्यात येत आहे.

अशा अनेक गरजू महिलांना घरबसल्या व्यवसाय करण्याची संधी रेश्मा शेख यांनी मीरा महिला बहूउद्देशीय सेवा भावी संस्थेच्या वतीने उपलब्ध करून दिली आहे. इच्छुक अनेक महिलांसाठी प्रशिक्षण कोर्सचे मोफत आयोजन करण्यात आले आहे.या प्रशिक्षण कोर्स मध्ये फॅशन डिझायनिंग कोर्स, ब्युटी पार्लर कोर्स, बॅग मेकिंग कोर्स, केक प्रशिक्षण कोर्स, आईस्क्रीम मेकिंग कोर्स, मेहंदी कोर्स, राखी कोर्स इत्यादी घरगुती व्यवसायाचे प्रशिक्षण (प्रमाणपत्रासाठी) फक्त 299 रु. प्रवेश फी मध्ये उपलब्ध असून हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यास संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र ही दिले जात आहे.

परिसरातील महिला,युवती व बचत गट सदस्यांसाठी, व मुख्यता महिला सक्षमीकरणाचा हेतू यासंस्थेमार्फत राबविण्यात येत आहे.सदर प्रशिक्षण कोर्समध्ये सध्या दीडशे महिला प्रशिक्षण घेत असून इच्छुक महिलांनी या प्रशिक्षण कोर्सचा लाभ घ्यावा असे मत रेश्मा शेख यांनी व्यक्त केले आहे.