Monday, April 15, 2024
Homeपुणेमावळमहेश भाऊ केदारी यांच्या निवासस्थानी त्यांचा पवना नगर शिवसैनिकांच्या वतीने सत्कार...

महेश भाऊ केदारी यांच्या निवासस्थानी त्यांचा पवना नगर शिवसैनिकांच्या वतीने सत्कार व धावती भेट…

लोणावळा दि.18: शिवसेना संपर्क प्रमुख मेहकर विधानसभा व महाराष्ट्र वाहतूक सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष महेश भाऊ केदारी यांच्या निवासस्थानी जाऊन पवना नगर येथील शिवसैनिकांनी घेतली धावती भेट.


शिवसैनिकांनी घेतलेल्या भेटी दरम्यान वाहतुक संघटने बाबत, शाखा वाढी बद्दल व इतर विषया संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांच्या वतीने महेशभाऊ यांचा शाल व पुष्प गुच्छ देऊन आभार पर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी एक जूट राहून कार्य करत आपल्या शाखेचे नाव वाढवावे व शाखा बळकट करावी त्यासाठी कार्यकर्त्यांना माझ्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन व मदत केली जाईल असे महेश भाऊ यांनी कार्यकर्त्यांना आश्वासन दिले.


यावेळी पवना नगर शाखाप्रमुख किशोर शिर्के, पवनानगर वाहतुक संघटना अध्यक्ष संतोष कालेकर, गटप्रमुख सचिन कालेकर,प्रविण वैष्णव,विकास कालेकर,एकनाथ कालेकर व पत्रकार संदिप मोरे उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page