Tuesday, December 31, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडमाजगाव ग्रा.पं उपसरपंच मीनल जाधव यांच्या खोट्या सहीचा घेतला राजीनामा, ग्रामपंचायतचा अजब...

माजगाव ग्रा.पं उपसरपंच मीनल जाधव यांच्या खोट्या सहीचा घेतला राजीनामा, ग्रामपंचायतचा अजब कारभार..


सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करावा – उपसरपंच मीनल जाधव यांची मागणी खालापूर पोलिसांत तक्रार दाखल.

खोपोली- 23 जुलै (दत्तात्रय शेडगे )

खालापूर तालुक्यातील प्रतिष्ठित असलेली माजगाव ग्रुप ग्रामपंचायतच्या विद्यमान उपसरपंच असलेल्या मीनल अरुण जाधव यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला नसून त्यांच्या खोटी सही करून राजीनामा दिला असल्याचे दाखवून येत्या 25 जुलै रोजी उपसरपंच पदाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

माजगाव ग्रामपंचायतच्या सदस्या मीनल अरुण जाधव यांनी जून 2019 मध्ये उपसरपंच पदाचा कार्यभार हाती घेतला व त्यांनी आजपर्यंत आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला नाही मात्र ग्रामपंचायत ने यांनी 23 जून 2020 रोजी मीनल जाधव यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला अशी खोटी सही करून राजीनामा दिला असल्याचे दाखविल्याचा माजगाव ग्रामपंचायतचा अजब कारभार चव्हाट्यावर आला आहे.

तर 25 जून रोजी घेण्यात आलेल्या मासिक सभेला उपसरपंच मीनल जाधव सह चार सदस्य हजर नव्हते त्यामुळे यांनी खोटी सही करून राजीनामा घेतल्याचा सरपंच व ग्रामसेवक अजब कारभार चव्हाट्यावर आला आहे.


तर एकीकडे देशात कोरोना व्हायरसने मोठे थैमान घातले असून कोरोना महामारीचे मोठे संकट देशावर असताना माजगाव ग्रामपंचायतची उपसरपंच पदाची निवडणूक 25 जुलै रोजी प्रशासनाने लावली असल्याने ग्रामस्थामध्ये असंतोष निर्माण झाला आहे,


तर येत्या 25 जुलै रोजी जाहीर झालेली उपसरपंच पदाची निवडणूक रद्द करावी यासाठी उपसरपंच मीनल जाधव यांनी जिल्हाधिकारी अलिबाग, तहसीलदार पंचायत समिती यांना निवेदन दिले असून खालापूर पोलिसांनी यांची तक्रार दाखल केली असून सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी उपसरपंच मीनल जाधव यांनी केली आहे,

प्रतिक्रिया

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून माझी खोटी सही करणाऱ्या व येत्या 25 जुलै रोजी होणाऱ्या उपसरपंच पदाची निवडणूक प्रकिया थांबवुन दोषींवर कठोर कारवाई करावी
मीनल जाधव.
उपसरपंच- ग्रामपंचायत माजगाव

प्रतिक्रिया-

मागील दोन वर्षांपासून सरपंच व ग्रामसेवक आणि ठेकेदार यांना हाताशी धरून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याची लेखी पुराव्यासह निवेदन दिले आहे, मात्र प्रशासनाने यांच्यावर अजूनपर्यंत काहीही कारवाई केली नाही.म्हणून सरपंच व ग्रामसेवक अशी खोटी काम करण्याचे धाडस करत आहेत..

भगवान जाधव-
सामाजिक कार्यकर्ते – आंबिवली-माजगाव.

- Advertisment -

You cannot copy content of this page