Friday, June 14, 2024
Homeपुणेमावळमाजी आमदार दिगंबर भेगडे यांचे निधन,पुणे जिल्हा राजकीय क्षेत्रात शोककळा..

माजी आमदार दिगंबर भेगडे यांचे निधन,पुणे जिल्हा राजकीय क्षेत्रात शोककळा..

मावळ (प्रतिनिधी): मावळ तालुक्यासह पुणे जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात प्रदीर्घकाळ कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणारे , अध्यात्मिक व कृषी क्षेत्रातील जाणकार व्यक्तिमत्व , माजी आमदार दिगंबर बाळोबा भेगडे ( वय 75 ) यांचे आज गुरुवारी दि .8 रोजी दुपारी 1:30 वा.च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले . भेगडे यांना आज सकाळी दहाच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले . उपचार सुरू असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
इंदोरी गावचे उपसरपंच म्हणून त्यांच्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात झाली . मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य , मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे सदस्य , मावळ तालुका पंचायत समितीचे उपसभापती , भाजपाचे जिल्हाध्यक्ष , दोन वेळा मावळ तालुक्याचे आमदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले.
दिगंबर भेगडे यांच्या आकस्मिक निधनाने राजकीय , सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे . त्यांच्या पश्चात पत्नी भागुबाई , दोन भाऊ , मुलगा मनोहर आणि प्रशांत , तीन मुली , पुतण्या तालुका भाजपचे अध्यक्ष रवींद्र भेगडे , सुना , नातवंडे असा मोठा परिवार असून त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 5 वाजता कुंडमळा , शेलारवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page