माजी आमदार सुरेश लाड यांचा राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा..

0
75

प्रतिनिधी (दत्तात्रय शेडगे )
खालापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत खालापूर मतदार संघांचे माजी आमदार सुरेश लाड यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा रायगड जिल्हाध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून रायगडात राष्ट्रवादी काँग्रेस ला मोठा धक्का बसला आहे.

आजारपनाचे कारण देत लाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.कर्जत खालापूर मतदार संघात राष्ट्रीवादी काँग्रेस पक्षाचे गेल्या अनेक वर्षापासून वर्चस्व असून सुरेश लाड हे तीन वेळा या मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत.मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाल्याने त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले होते त्यामुळे कर्जत खालापूर मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत नवचैतन्य आले होते मात्र माजी आमदार सुरेश लाड यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

तर खालापूर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्यांच्या शिवसेना नेत्यांसोबत होणाऱ्या गुप्त बैठका, आणि कर्जत खालापूर मध्ये महाविकास आघाडी करताना होणारी घुसमट ही लाड यांना सतावत होती अखेर त्यांनी आज आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ला मोठा धक्का बसला आहे, मात्र लाड हे आगामी काळात कोणता वेगळा निर्णय घेणार की राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातच राहणार हा येणारा काळच ठरवेल.