Thursday, September 28, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडमाजी नगराध्यक्ष - नगरसेवक पती-पत्नीचे एकाच दिवशी निधन...

माजी नगराध्यक्ष – नगरसेवक पती-पत्नीचे एकाच दिवशी निधन…

खोपोली (दत्तात्रय शेडगे) माजी नगराध्यक्ष, माजी शिक्षण मंडळ सभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते रोहिदास उर्फ नाना पाटील तसेच त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका निर्मला रोहिदास पाटील या पती-पत्नी जोडीने एकाच दिवशी जगाचा निरोप घेतला.

कोरोना मुळे त्यांचे निधन झाले असून पतिपत्नी च्या या दुःखद निधनाने संपूर्ण खोपोली शहर दुःखाच्या छायेत गेले.रोहिदास पाटील व निर्मला पाटील यांच्या वर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते . शुक्रवारी दुपारी साडे अकराच्या सुमारास निर्मला पाटील यांचे उपचार सुरू असतानाच हृदयविकाराने निधन झाल्याची बातमी धडकली.

या बाबत माध्यमातून श्रद्धांजली व्यक्त होत असतानाच दुपारी दोन वाजता रोहिदास उर्फ नाना पाटील यांचे ही निधन झाल्याची बातमी धडकल्यावर संपूर्ण शहर सुन्न झाले . खोपोलीत सर्वांसाठी नाना म्हणून प्रसिद्ध असलेले व सर्वांसाठी सन्मानित असलेले रोहिदास पाटील व त्यांच्या पत्नीचे एकाच दिवशी दुःखद निधन झाल्याने संपूर्ण खोपोली शहर दुःखाच्या छायेत गेले असून , शहरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -