माजी मुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता महाविकास आघाडी सरकारला खुपत आहे..

0
99


आमदार गोपीचंद पडळकर यांची सरकारवर टीका..

खोपोली- दत्तात्रय शेडगे

माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता महाविकास आघाडी सरकारला खुपत आहे त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने आकस बुद्धीने त्यांची सुरक्षा काढून घेतली आहे.
अशी घणाघाती टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत महाराष्ट्रातील पीडित ,उपेक्षित, गोर गरीब जनतेचे आशीर्वाद आहेत, व तेच त्याचे सुरक्षा कवच आहे.
त्यांना मुळातच सुरक्षेची गरज नाही जे लोक घराभोवत सुरक्षा घेऊन बसले आहेत त्यांची सुरक्षा काढण्याची खरी गरज आहे महाविकास आघाडी सरकार हे कपट नीतीने व सूड बुद्धीने हा निर्णय घेतेय हे महाराष्ट्राच्या लक्ष्यात येतेय अशी टीका भाजप नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारवर केली आहे.