Wednesday, September 27, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडमाजी सरपंच व कट्टर शिवसैनिक अनंत पारठे यांचे निधन..

माजी सरपंच व कट्टर शिवसैनिक अनंत पारठे यांचे निधन..

खोपोली- दत्तात्रय शेडगे

खालापूर तालुक्यातील कट्टर शिवसैनिक व ग्रुप ग्रामपंचायत वावर्ले चे माजी सरपंच, अनंत काशीनाथ पारठे यांचे आज कोरोनामुळे मृत्यू झाल्याने वावर्ले गावासह चौक परिसरावर शोककळा पसरली आहे. गेली काही दिवस ते कोरोनाशी झुंज देत असताना अखेर झुंज अपयशी ठरली .


अनंत पारठे हे स्व.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक होते.शिवसैनिक ते सरपंच असा त्यांचा प्रवास होता.शिवसैनिक म्हणून त्यांचा दरारा बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असणारा होता.सर्वसामान्य लोकांना मदत करणे,स्मितभाषी म्हणूनच ते परिचित होते.

सरपंच पदाच्या कारकिर्दीत त्यांनी विकास कामांची भरारी घेतली होती.रस्ते,पाणी पुरवठा,दिवाबत्ती,स्वच्छता अभियान,शैक्षणिक दर्जा चांगला ठेवला होता. आमदार महेंद्र थोरवे,मा.आमदार व जिल्हाप्रमुख मनोहर भोईर,जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे,विभागप्रमुख सुधीर ठोंबरे,प्रफुल्ल विचारे,बाबू दरेकर,माजी सरपंच राजुशेठ मोरे यांच्या सह अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

- Advertisment -