Saturday, July 27, 2024
Homeपुणेमावळमाझ्याकडे सहा आमदारांची ताकद आहे - श्रीरंग आप्पा बारणे..

माझ्याकडे सहा आमदारांची ताकद आहे – श्रीरंग आप्पा बारणे..

माझ्याकडे जनतेची ताकद आहे – संजोग वाघेरे पाटील..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) मावळ लोकसभा मतदार संघात ” शिवसेना विरुद्ध शिवसेना ” अशी चुरशीची लढाई झाली आहे . गेली १५ वर्षे शिवसेनेची व सलग १० वर्षे श्रीरंग आप्पा बारणे यांची या मतदार संघावर शिवसेनेच्या माध्यमातून ताकद आहे . कधी नव्हे ती आता ” शिवसेना विरुद्ध शिवसेना ” अशी लढत मतदारांना पहाण्यास मिळाली आहे . एकीकडे शिवसेना – भारतीय जनता पक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – महाराष्ट्र नवनिर्माण सेना – आर पी आय – व इतर पक्ष तर या विरोधात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार – काँग्रेस पक्ष – शेकाप – आप – कम्युनिस्ट पक्ष – इतर पक्ष अशी लढत झालेली आहे . त्यामुळे कोण या मावळ लोकसभा मतदार संघातून निवडून येणारं ? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

मावळ लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ येत आहेत . यापैकी घाटावर तीन तर घाटाखाली तीन मतदार संघ येत आहेत . यामध्ये कर्जत – खालापूर मतदार संघात शिवसेनेचे महेंद्र शेठ थोरवे , उरण मतदार संघात भाजप प्रणित महेश बालदी , पनवेल मतदार संघात भाजपाचे प्रशांत ठाकूर , मावळ मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील आप्पा शेळके , पिंपरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अण्णा बनसोडे , तर चिंचवड येथे भाजपाच्या अश्विनी जगताप हे आमदार म्हणून कार्यरत आहेत . हे सर्व महायुतीचे आमदार असल्याने महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्याकडे ” सहा आमदारांची ताकद आहे ” , म्हणून त्यांचे पारडे नक्कीच जड आहे . मात्र महा आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्याकडे काय आहे ? , अशी चर्चा या मतदार संघात होत असताना , ” माझ्याकडे जनतेची – मतदार राजाची ताकद आहे ” , असे ऐकण्यास मिळत आहे . त्यामुळे ” इच्छा शक्ती विरुद्ध सहानभुती ” अशी हि लढत असल्याने अखेर कोण कुणावर मात करतो , याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

मावळ लोकसभा मतदार संघात एकूण २५ लाख ८५ हजार मतदार असताना फक्त १४ लाख १८ हजार असे ५४ टक्केच मतदान झाले असून मतदानाच्या दिवशी ४ वाजता झालेल्या वादळ वारा व पावसामुळे दुपारनंतर मतदान कमी झाले , त्यामुळे हे ” अघटीत व निसर्गाचा आघात ” कुणावर उलटतो , हे ही महत्त्वाचे आहे . मात्र राजकीय तज्ञांच्या मते महायुतीचे उमेदवार ” श्रीरंग आप्पा बारणे ” हे ” दिड लाखांच्या फरकाने ” निवडून येतील , असा अंदाज व्यक्त केला असून , अखेर ” जो जिता वो हि सिकंदर ” हेच सत्य असून ४ जून ला मावळ लोकसभा मतदार संघात कोण बाजी मारणार , हे समजणार आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page