Wednesday, May 29, 2024
Homeपुणेमावळमाझ कुटुंब ,माझी जबाबदारी या सर्वेक्षण अभियानाला, शिलाटने,मळवली, सदापुर ,...

माझ कुटुंब ,माझी जबाबदारी या सर्वेक्षण अभियानाला, शिलाटने,मळवली, सदापुर , मुंढावरे, पाटन,भाजे येथील नागरीकांचा उस्फूर्त प्रतिसाद..

मावळ : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सर्वत्र ” माझे कुटुंब माझी जबाबदारी ” अंतर्गत आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. ह्या मोहिमेअंतर्गत आज मळवली, सदापूर, भाजे, पाटण, शिलाटणे, ह्या गावांमधील 6,574 नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. मावळचे आमदार सुनील शेळके, प्रांत संदेश शिर्के, तहसीलदार मदुसूदन बर्गे, आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे, आरोग्य समन्वयक गुणेश बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेवक नासिर पठाण व ग्रामसेविका मोहिनी दौडकर आणि इतर ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांच्या उपस्थितीत ह्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

आज आरोग्य मोहिमेअंतर्गत मळवली सदापूर ग्रामपंचायत हद्दीतील 392 कुटुंबातील 1470 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली तर पाटण गावामधील 394 कुटुंबाचे 1525 नागरिक, भाजे गावातील 405 कुटुंबातील 1635 नागरिक, शिलाटणे गावातील 330 कुटुंबाच्या 1494 नागरिक तसेच मुंढावरे गावामधून 95 कुटुंबातील 443 नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली.
त्यावेळी ह्या सर्व गावांमध्ये एकदिवसीय जनता कर्फ्यू पाळत उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यात आला. आरोग्य तपासणी करीता शिक्षक, आशा सेविका, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य व कर्मचारी यांनी स्वयंसेवक म्हणून जबाबदारी पार पाडत प्रत्येक नागरिकांची थर्मामीटर, पल्स ऑक्सिमीटर च्या साहाय्याने तपासणी करण्यात आली. तर गावातील सरपंच, उपसरपंच, पो. पाटील व सदस्य यांनी जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी होण्याकरिता मार्गदर्शन केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page