माथेरानची नात कु. हर्षा विनोद शिंदे ठरली मिस हेरिटीज इंडियाची मानकरी !

0
274

माथेरानच्या सांस्कृतिक वारसेत मानाचा तुरा…

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
भारतीय सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी व मुलींमध्ये भविष्यात गरुड भरारी घेण्यासाठी स्टेज डेरिंग वाढण्यासाठी मृणाल गायकवाड यांच्या एंटरटेंनमेंट आयोजित कार्यक्रमात ” मिस हेरिटीज इंडिया ” स्पर्धा पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेल मध्ये पार पडली.या स्पर्धेत माथेरान येथील तसेच सध्या महाबळेश्वर येथे वास्तव्य असलेले कु. हर्षा विनोद शिंदे ही या स्पर्धेची मिस हेरिटीज इंडिया ची मानकरी ठरली.

या स्पर्धेत एकूण देशभरातुन सतरा युवतींनी सहभाग घेतला होता.स्पर्धेची मानकरी ठरलेली मराठ – मोळी हर्षा हिचे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तसेच अभिनेत्री हेमांगी कवि यांनी मुकुट चढवून कौतुक केले.हर्षाने आपल्या या यशामागे आई वडीलांचे मोलाचे मार्गदर्शन असल्याचे सांगितले तसेच मेहनत हीच यशस्वी जीवनाची गुरू किल्ली असल्याचे हर्षा सांगते. लेखन व निसर्ग, व्यक्ती, वास्तू पेंटींग हा हर्षाचा छंद आहे. सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी जागतिक स्पर्धेचे नेतृत्व करणार असल्याचा मानस हर्षाचा आहे.


हर्षा ही माथेरानच्या माजी नगरसेविका वासंतीताई जांभळे यांची नात आहे , त्यामुळे माथेरान मधुन हर्षा वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.हर्षा म्हणते स्त्री म्हणजे वात्सल्य स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व , स्त्री म्हणजे राणी येसुबाई सारखे कर्तृत्व ! हेच कर्तृत्व प्रत्येक मुलीने करावे अशी ईच्छा प्रत्येक आई वङिलांची असते , हेच स्वप्न हर्षाने पुर्ण केले आहे.