Sunday, September 24, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडमाथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांचे पर्यटकांसह स्थानिकांना सुरक्षे विषयी बाबत आवाहन..

माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांचे पर्यटकांसह स्थानिकांना सुरक्षे विषयी बाबत आवाहन..

दत्ता शिंदे ….माथेरान

माथेरान पर्यटकांसाठी बुधवार दि ०२ सप्टेंबर २०२० पासून खुले करण्यात आले महाराष्ट्र शासनाच्या Mission Begin Again च्या दि ३१ ऑगस्ट २०२० च्या परिपत्रक नुसार- मा जिल्हाधिकारी रायगड, अलिबाग यांच्या आदेशाप्रमाणे शासनाच्या नियमांचे पालन करावे.आपणा सर्वांना आम्ही वेळोवेळी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे सूचीत करीत आहोत तरी कृपया सर्वांनी मास्कचा वापर करा.


आपल्या माथेरान मध्ये पर्यटक येण्यास सुरुवात झाली ही आनंदाची बाब आहे आणि त्याचबरोबरीने आपण सुरक्षेच्या दृष्टीने नियमांचे पालन करणे ही सुद्धा अत्यंत महत्वाची बाब आहे

पर्यटकांना सुद्धा आपण सुरक्षेच्या कारणास्तव मास्क वापरण्यास आग्रही रहा. काही जण बिनधास्त मास्क न लावता फिरत असतात दंडाची आठवण करून दिली की उलटसुलट चर्चा सुरू होते.सर्वांना मनापासून विनंती आहे प्रशासन सांगतंय ते नियम पाळा.

आपलं माथेरान सुंदर, स्वच्छ आहेच तसंच ते कोरोनापासून सुरक्षित ठेवणं ,स्वतः बरोबर पर्यटकांना सुरक्षित असल्याची जाणीव करून देणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.नगरपरिषद आपलं काम चोख करण्यास सज्ज आहे आपली साथ मोलाची आहे पर्यटन वाढीसाठी.

- Advertisment -